एकाच अधिकाऱ्यावर ‘मत्स्य’चा कारभार

By Admin | Updated: November 25, 2015 00:22 IST2015-11-24T23:52:42+5:302015-11-25T00:22:14+5:30

बीड : येथील मत्स्यव्यवसाय विकास कार्यालयाला सध्या रिक्त पदांची घरघर असून केवळ एकाच अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

The management of the 'fish' on one officer | एकाच अधिकाऱ्यावर ‘मत्स्य’चा कारभार

एकाच अधिकाऱ्यावर ‘मत्स्य’चा कारभार


बीड : येथील मत्स्यव्यवसाय विकास कार्यालयाला सध्या रिक्त पदांची घरघर असून केवळ एकाच अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लातूरच्या सहायक आयुक्तांकडे बीडचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या रिक्तपदांमुळे विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यास अडचणी येत असून उपलब्ध अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.
बार्शी रोडवरील किरायाच्या जागेत असलेल्या मत्स्यव्यवसाय विकास कार्यालयात एकुण १४ लोक कार्यरत आहेत. यामध्ये सहायक आयुक्तांसह मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांची पदे रिक्त आहेत. तर सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पदावर मीना केंद्रे या नुकत्याच रूजू झाल्या आहेत. या दोन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या जागाही रिक्त आहेत. यामुळे कामाचा ताण तर वाढलाच आहे, शिवाय शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी आलेल्या विविध योजनांची माहिती, मार्गदर्शन करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे या कार्यालयातील रिक्त पदे भरावेत, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The management of the 'fish' on one officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.