शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीसमोर आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 14:57 IST

फुलंब्री बसस्थानकाजवळ दुचाकीसमोर अचानक कुत्रा आला.

ठळक मुद्दे कंपनीत कामाला जात असताना काळाचा घालाफुलंब्री बसस्थानकाजवळील घटना  

फुलंब्री : दुचाकीसमोर अचानक आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या नादात खाली पडलेल्या तरुणाला मागून येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेदरम्यान फुलंब्री येथील बसस्थानकाजवळ घडली. संतोष रावसाहेब भोपळे (२२) असे मयत तरुणाचे नाव आहे.

फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथील संतोष भोपळे हा चितेगाव येथील अजित सीड्स कंपनीत नोकरी करीत होता. गावाहून तो शुक्रवारी सकाळीच कंपनीत जाण्यासाठी निघाला होता. फुलंब्री बसस्थानकाजवळ आल्यानंतर त्याच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रा आला. त्याला वाचविण्याच्या गडबडीत दुचाकीवरील नियंत्रण सुटून तो खाली पडला. तेवढ्यात मागून गॅसच्या टाक्या घेऊन औरंगाबादकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक (एम.एच.- १८ बी.जी.- १५९९) ने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रकचालक स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेची माहिती मिळताच फुलंब्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतोषला रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावरच कुटुंबावर आघातसंतोषचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ऐन दिवाळीच्या तोंडावरच भोपळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संतोषच्या पश्चात आई वडील, पत्नी व एक आठ महिन्याचा मुलगा आहे. संतोषचे वडील रावसाहेब भोपळे हे कीर्तनकार असल्याने पंचक्रोशीतून या घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद