नित्रूडमध्ये आढळले कुपोषित बालक
By Admin | Updated: July 16, 2017 00:18 IST2017-07-16T00:17:03+5:302017-07-16T00:18:04+5:30
माजलगाव :शनिवारी नित्रूड येथे आकाश अंकुश साळवे हा दहा महिन्याचा बालक कुपोषित आढळला

नित्रूडमध्ये आढळले कुपोषित बालक
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : केसापुरी वसाहत परिसरात तीन कुपोषित बालके आढळल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी नित्रूड येथे आकाश अंकुश साळवे हा दहा महिन्याचा बालक कुपोषित आढळला. पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
आरोग्य विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे पालावर, वस्तीवर व वीटभट्टीवर कुपोषित बालके आढळून येत आहेत. नित्रूड येथील वीटभट्टीवर मजुरी करत असलेल्या अंकुश साळवे यांचा मुलगा आकाश हा कुपोषित आढळला आहे. त्याला पात्रूडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते. प्राथमिक उपचार करून आकाशला बीडला हलविले आहे.