माल्डीत महिलेस मारहाण

By Admin | Updated: November 19, 2014 13:09 IST2014-11-19T13:08:31+5:302014-11-19T13:09:18+5:30

औंढा तालुक्यातील माल्डी येथे घरासमोर नालीतील गाळ का टाकला? या कारणावरून महिलेस मारहाण करून पायर्‍या पाडल्याप्रकरणी चौघांविरूद्ध कुरूंदा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

Maldives beat women | माल्डीत महिलेस मारहाण

माल्डीत महिलेस मारहाण

पोलिसांत नोंद : क्षुल्लक कारणावरून घटना

कुरूंदा : औंढा तालुक्यातील माल्डी येथे घरासमोर नालीतील गाळ का टाकला? या कारणावरून महिलेस मारहाण करून पायर्‍या पाडल्याप्रकरणी चौघांविरूद्ध कुरूंदा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
माल्डी येथील फिर्यादी सुनिता बालाजी नरोटे (वय २३) या महिलेच्या घरासमोर नालीचे पाणी व गाळ टाकला. याबाबत विचारणा केली असता आरोपींनी संगणमत करून ही जागा आमची आहे, आम्ही या जागेत काहीपण करू, तुझा रस्ता बंद करू शकतो, असे म्हणून ईल शिवीगाळ करून वीट मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी देऊन दारावरच्या पायर्‍या, ओटा पाडला. ही घटना १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी आरोपी यगुत्राबाई उत्तमराव शेळके, उमराव दादाराव शेळके, प्रकाश उत्तम शेळके, रमेश दादाराव शेळके यांच्याविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तपास जमादार गणेश मस्के करीत आहेत./

Web Title: Maldives beat women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.