मलशेट्टी पाटील हजारोंच्या उपस्थितीत अनंतात विलिन
By Admin | Updated: July 4, 2014 00:15 IST2014-07-03T23:40:41+5:302014-07-04T00:15:10+5:30
उदगीर : जुन्या पिढीतील काँग्रेसचे जेष्ठ नेते मलशेट्टीअप्पा पाटील नागराळकर यांच्या पार्थिवावर नागराळ (ता़देवणी) या त्यांच्या मुळ गावी हजारोंच्या उपस्थितीत गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले़

मलशेट्टी पाटील हजारोंच्या उपस्थितीत अनंतात विलिन
उदगीर : जुन्या पिढीतील काँग्रेसचे जेष्ठ नेते मलशेट्टीअप्पा पाटील नागराळकर यांच्या पार्थिवावर नागराळ (ता़देवणी) या त्यांच्या मुळ गावी हजारोंच्या उपस्थितीत गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले़ अप्पांना अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यासह शेजारच्या सीमावर्ती भागातून जनसागर लोटला होता़
मलशेट्टीअप्पा पाटील यांनी निधनापूर्वी आपल्या अंत्यसंस्काराची जागा निश्चित करून ठेवली होती़ या अंत्यसंस्कार झालेल्या परिसराला त्यांनी 'शांतीवन' असे नामकरण केले होते़ या फळबागेस 'कुमार बाग' म्हणून नांव दिले आहे़ गुरूवारी सकाळी ९ वाजेपर्यंत अप्पांचे पार्थिव देह उदगीरच्या नवी आबादी येथे सिध्देश्वर निवासात अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले होते़ त्यांनतर त्यांचे पार्थिवदेह नागराळ येथे नेण्यात आले़ दुपारी एक वाजेपर्यंत जनसमुदायांनी अप्पांचे अंत्यदर्शन घेतले़ त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले़ यावेळी माजी मंत्री बाळासाहेब जाधव, आ़बाबासाहेब पाटील, आ़वैजनाथ शिंदे, लातूरच्या महापौर स्मिता खानापुरे, उपमहापौर सुरेश पवार, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आ़चंद्रशेखर भोसले, नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष अॅड़त्र्यंबकदास झंवर, मनसेचे जिल्हाप्रमुख अभय साळुके, माजी कुलगुरू डॉ़शिवराज नाकाडे, अॅड़प्रभाकर काळे, प्रदेश काँग्रेसचे प्रकाश येरगुलवार, प्रकाश सातपुते, डी़बी़लोहारे, भगवान सिंह बयास, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष धिरज देशमुख, शरद पाटील निलंगेकर, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ज्योती पवार, जागृतीचे चेअरमन लक्ष्मण मोरे, जि़प़अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, प्रा़सुभाष बडिहवेली, यशवंत पाटील यांनी अप्पांच्या आठवणींना उजाळा देवून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली़ अप्पांच्या निधनामुळे शहरातील सर्व शिक्षण संस्था बंद ठेवून अप्पांना श्रध्दांजली अर्पण केली़(वार्ताहर)