केलेले काम व खर्चाचा निधी सार्वजनिक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2017 00:17 IST2017-07-01T00:17:36+5:302017-07-01T00:17:36+5:30
कंपनीला होणाऱ्या लाभाचा काही भाग सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कामावर खर्च करणे,

केलेले काम व खर्चाचा निधी सार्वजनिक करा
अविनाश चमकुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: नागरिकांना निर्भेळ खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे़ मात्र रिक्त पदांची लागण झालेल्या या विभागाचा भार सद्य:स्थितीत फक्त दोन अधिकाऱ्यांवर असल्याने जिल्ह्यातील ३३ लाख नागरिकांची अन्नसुरक्षा धोक्यात आली आहे़
ग्राहकांना सुरक्षित अन्न व भेसळविरहित खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देण्यासाठी विविध आस्थापनांची तपासणी, खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या आस्थापनांना परवाना वितरण, परवाना नूतनीकरण, सणासुदीच्या काळात मिठाईघरांची तपासणी, पॅकेज््ड ड्रिकींग वॉटर दर्जा तपासणी, गुटखाबंदी, जिल्ह्यात येणारे महत्त्वाचे व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या जेवणाचे नमुने तपासणी, न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणांची सुनावणी व पाठपुरावा यासह विविध प्रकारची कामे या विभागास करावी लागतात़
नांदेड जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता किनवट तालुका दीडशे किलोमीटर अंतरावर आहे़ शेजारील हिंगोली, परभणी व लातूर जिल्ह्याचे अंतर ८० ते १४० किलोमीटर असताना नांदेड जिल्ह्याचे शेवटचे टोक पावणेदोनशे किलोमीटर अंतरावर आहे़ अन्न व औषध प्रशासन विभागाचे नांदेड येथे जिल्हा कार्यालय आहे़ कार्यालय एकत्र असले तरी अन्न व औषध विभागाचे कामकाज स्वतंत्ररीत्या चालते़ अन्न विभागासाठी सहायक आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली पाच अन्नसुरक्षा अधिकारी व दोन नमुना सहायकांची पदे मंजूर आहेत़
येथील सहायक आयुक्त पी़ डी़ गळाकाटू यांची बदली लातूरला झाल्याने हे पद रिक्त झाले असून तात्पुरता पदभार परभणीचे सहायक आयुक्त के़आऱ जयपूरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे़ त्यामुळे परभणी, हिंंगोली, जालना व नांदेड अशा चार जिल्ह्यांचा पदभार जयपूरकर यांच्याकडे आहे़ कारवाईच्या धडाक्याने वेगळी प्रतिमा निर्माण केलेले अन्नसुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांची बदली दीड वर्षांपूर्वी यवतमाळ येथे झाली़ तेव्हापासून त्यांचे पद रिक्तच आहे़ तसेच अन्नसुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड व संजय चट्टे यांची बदली महिनाभरापूर्वी अनुक्रमे परभणी व जालना येथे झाल्याने त्यांचेही पद रिक्तच आहे़
सद्य:स्थितीत सचिन केदारे व कावळे या दोन अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांवर सबंध जिल्ह्याची अन्नसुरक्षा अवलंबून आहे़ कार्यालयातील कामकाज, परवाना तपासणी, नूतनीकरण, धाडीच्या नोंदी व कारवाई आदी कामांचा भार त्यांच्यावर आहे़ उर्वरित तीन पदे सध्यातरी रिक्तच आहेत़