पैसे द्या, कोणतेही औषध घ्या

By Admin | Updated: February 10, 2015 00:32 IST2015-02-10T00:15:42+5:302015-02-10T00:32:54+5:30

औरंगाबाद : कोणत्याही प्रकारची औषधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे प्राणघातक ठरू शकते. असे असले तरी त्याकडे डोळेझाक करण्यात येत असल्याने

Make a payment, take any medicine | पैसे द्या, कोणतेही औषध घ्या

पैसे द्या, कोणतेही औषध घ्या


औरंगाबाद : कोणत्याही प्रकारची औषधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे प्राणघातक ठरू शकते. असे असले तरी त्याकडे डोळेझाक करण्यात येत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि केवळ मेडिकल दुकानदारास विचारून औषधी सेवन करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्याचे होेणारे दुष्परिणाम गंभीर असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी विक्री करू नका, असे स्पष्ट आदेशच औषध विक्रेत्यांना दिले आहेत. मात्र, लोेकमतने शुक्रवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये कोणत्याही प्रकारची औषधी विनाप्रिस्क्रिप्शन सहज बाजारात मिळत असल्याचे उघड झाले.
कोणत्याही औषधाची थोेडीही मात्रा जास्त घेण्यात आली तर ते प्राणघातकही ठरू शकते. हे लक्षात घेऊन शासनाने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी सेवन करू नये, असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार सर्व प्रकारच्या गोळ्या, औषधांच्या पाकिटावर औषध कोणत्या प्रकारचे आहे आणि ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे, असे लिहिलेले असते. पोट दुखते म्हणून एखाद्या वेळी डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाचे नाव लक्षात ठेवून रुग्ण दुसऱ्यांदा पोट दुखत असल्यास पुन्हा डॉक्टरांकडे न जाता थेट मेडिकलवर जातो. तेथून तो जुन्या औषधाचे नाव सांगून ते घेतो. एवढेच नव्हे तर कुटुंबातील अन्य कोणत्याही सदस्याला असाच त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांची फीस चुकविण्यासाठी होणाऱ्या त्रासाची माहिती औषध विक्रेत्यास देऊन त्याच्याकडून गोळ्या, औषधी खरेदी करतोे.
विशेषत: खेड्यापाड्यात जेव्हा डॉक्टर भेटत नाही आणि मेडिकल स्टोअरही नसते, अशा ठिकाणी तर किराणा दुकानात पोटदुखी, थंडी, ताप आणि जुलाबावरील गोळ्या सहज मिळतात आणि गोळ्यांचा डोसही मनमानीपणे घेतला जातो.
शहरातही हा प्रकार सर्रास सुरू असल्याचे लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले. पुंडलिकनगर रोडवरील एका औषध दुकानदाराकडून विनाप्रिस्क्र्रिप्शन पॅरॉसिटिमॉलच्या दहा गोळ्यांचे पाकीट खरेदी करण्यात आले. समर्थनगर येथेही रक्तदाबाची औषधी खरेदी करण्यात आली. शिवाय लघवीला अडथळा येत असल्याचे सांगून केवळ औैषधांचे नाव सांगितल्यानंतर महागड्या गोळ्या विक्री करण्याची तयारी दुकानदाराने दर्शविली. मात्र, गोळ्यांच्या किमती पाहून सदर प्रतिनिधीनेच त्या गोळ्या खरेदी केल्या नाहीत. शहरातील समर्थनगर, पुंडलिकनगर रोड, त्रिमूर्ती चौक, घाटी परिसर इ. ठिकाणी औषधी विनाप्रिस्क्रिप्शन सहज मिळत असल्याचे दिसून आले.
याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) औरंगाबाद शाखेचे सचिव डॉ. कुलदीपसिंग राऊळ म्हणाले की, डॉक्टर रुग्णाच्या आजाराचे निदान केल्यानंतर औषधांचे प्रिस्क्रि प्शन लिहून देतो.
४मात्र, रुग्ण केवळ डॉक्टरांची फीस द्यावी लागू नये, यासाठी परस्पर औषध विक्रेत्यांकडून औषधी घेतो.
४खरे तर विक्रेत्यांनी अशा प्रकारची विक्री करूनये. त्याचे दुष्परिणाम रुग्णाच्या शरीरावर होतात.
सर्वप्रथम शहरातील एका नामांकित डॉक्टरकडून विविध औषधांच्या नावाची यादी आम्ही मोबाईल एसएमएसवरून मागवून घेतली. त्यानंतरही कोणते औषध कशासाठी वापरण्यात येते, याबाबतची माहिती त्यांच्याकडूून घेण्यात आली. त्यानंतर शहरातील विविध भागांतील मेडिकलवर जाऊन औषधीचे नाव सांगून त्यांच्याकडून औषध खरेदी करण्यात आले. या औषधांच्या किमतीएवढी रक्कम सदर विके्रत्यास देण्यात आली.
अनेकांनी केले नियमांचे पालन
४प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी विक्री करूनका, या आदेशाचे शहरातील अनेक दुकानदार पालन करीत असल्याचे लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान समोर आले. अनेक विक्रेत्यांनी कोणत्या डॉक्टरांकडे उपचार सुरू आहेत, औषध कंपनीचे नाव नवीन वाटते, आमच्याकडे उपलब्ध नाही, अशी विविध कारणे सांगून औषधी देण्यास नकार दिला.
विशेषत: वृद्धांना गुडघेदुखीचा त्रास होतो, तेव्हा त्यांचे कुटुंबिय याबाबत औषध विक्रेत्यांना सांगून पेनकिलर खरेदी करतो. पेनकिलरच्या अतिसेवनामुळे रुग्णाच्या किडन्या खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे अपायकारकच आहे.

Web Title: Make a payment, take any medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.