मजुरांना रोहयोची कामे उपलब्ध करून द्या...!
By Admin | Updated: February 8, 2016 00:14 IST2016-02-07T23:59:55+5:302016-02-08T00:14:39+5:30
जालना : जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असून, मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेतून मागेल त्याला काम उपलब्ध करु न देण्यात यावेत,

मजुरांना रोहयोची कामे उपलब्ध करून द्या...!
जालना : जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असून, मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेतून मागेल त्याला काम उपलब्ध करु न देण्यात यावेत, तसेच रोहयोंतर्गत अपूर्ण असलेल्या विहिरींची कामे तातडीने पूर्ण करून प्रलंबित असलेली देयके तातडीने अदा करण्याचे निर्देश खासदार रावसाहेब दानवे-पाटील यांनी रविवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात रविवारी आयोजित जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी आ. अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम जाधव, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, रामेश्वर भांदरगे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे आदींची उपस्थिती होती.
खा. दानवे म्हणाले की, जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात विहिरींची कामे मंजूर करण्यात आली आहेत. अपूर्ण विहिरींच्या कामांची संख्या अधिक आहे. ही कामे तातडीने पूर्ण करण्याबरोबरच शेतकऱ्यांची प्रलंबित असलेली देयके तात्काळ अदा करण्यासाठी अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देण्याच्या सूचनाही खा. दानवे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बचतगट आहेत. आता बचत गटांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये कर्जासाठी प्रकरणे दाखल केलेली आहेत. बचत गटांना कर्ज देण्यासंदर्भात बँकेकडे प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्याबरोबरच मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळण्यासाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची प्रकरणेही तातडीने मंजूर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी आ. अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या . सुरूवातील जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी विविध विभागांमार्फत करण्यात आलेल्या कामाची विस्तृतपणे माहिती दिली. यावेळी प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींनी दिल्या.
यावेळी उपजिल्हाधिकरी राजेश जोशी, उपविभागीय अधिकारी श्रीकार, चिंचकर, लक्ष्मीनारायण मिश्रा, अरविंद लोखंडे, तहसीलदार रेवणाथ लबडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बेलापट्टे, डीआरडीचे कौसलकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, महिला व बालविकास अधिकारी इंगळे, गृहपाल सुमेध मोरे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, सर्व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत होत असलेल्या कामांची माहिती जाणून घेत प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या पोकलेन मशिनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत समानतेने कामे होतील यासाठी अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
४खा. दानवे पाटील यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजना, पाणी पुरवठा, अधिकारी-कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, रस्ते विकास, कृषी विभाग, जलयुक्त शिवार, वीज वितरण, आदी विषयावर उपस्थित अधिकाऱ्यांकडून विस्तृतपणे माहिती जाणून घेत योग्य ते निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.