जागा उपलब्ध करा, सुविधा पुरवू...!ं

By Admin | Updated: October 1, 2016 01:07 IST2016-10-01T00:49:45+5:302016-10-01T01:07:43+5:30

भोकरदन/वडोद तांगडा : भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील स्मशानभूमिचा प्रश्न लोकमतने शुक्रवारी वृत्त प्रकाशित करून निदर्शनास आणला होता.

Make available space, provide facility ...! | जागा उपलब्ध करा, सुविधा पुरवू...!ं

जागा उपलब्ध करा, सुविधा पुरवू...!ं


भोकरदन/वडोद तांगडा : भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील स्मशानभूमिचा प्रश्न लोकमतने शुक्रवारी वृत्त प्रकाशित करून निदर्शनास आणला होता. याची दखल घेत आ. संतोष दानवे यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. ग्रामस्थांनी जागा द्यावी, सुविधांसाठी अपण निधी देऊ, असे अश्वासन आ.दानवे यांनी दिले.
वडोद तांगडा येथील जवान योगेश भालेराव यांच्यावर स्मशान भूमिसाठी हक्काची जागा नसल्याने जिल्हा परिषद शाळेच्या आवारातच अंत्यसंस्कार केले होते. याबाबत लोकमतने ‘सुविधांअभावी शाळेच्या आवारातच अंत्यसंस्कार’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत आ. संतोष दानवे यांनी तात्काळ ग्रामस्थांची बैठक घेतली. ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून द्यावी आपण रस्ता, संरक्षण भींत आणि शेडची व्यवस्थेसाठी निधी देऊ, असे आश्वासन दिले. तत्पूर्वी भालेराव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच यापुढे येणाऱ्या अडचणी सोडविण्याची जबाबदारीही त्यांनी घेतली.
यावेळी सरपंच रामधन राजपूत, उपसरपंच पंजाबराव तांगडे, कृष्ण तांगडे, संग्राम राजपूत, गजानन तांदुळजे, आर.पी.तांगडे, बजाबा तांगडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Make available space, provide facility ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.