विद्यार्थिनींची पर्यायी व्यवस्था करा
By Admin | Updated: October 12, 2014 00:41 IST2014-10-12T00:41:05+5:302014-10-12T00:41:05+5:30
कळंब : येथील आदिवासी मुलींसाठीचे शासकीय वसतीगृह स्थलांतरीत करण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल समाजघटकांतून तीव्र प्रक्रिया उमटत असतानाच

विद्यार्थिनींची पर्यायी व्यवस्था करा
कळंब : येथील आदिवासी मुलींसाठीचे शासकीय वसतीगृह स्थलांतरीत करण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल समाजघटकांतून तीव्र प्रक्रिया उमटत असतानाच या वसतिगृहात राहत असलेल्या मुलींच्या पालकांना प्रशासनाने नोटिसा पाठविल्या आहेत़ हे वसतीगृह स्थलांतरीत करण्यात येत असून, या बाबीची गंभीरतेने दखल घेवून पर्यायी व्यवस्था करावी, असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे़ या नोटीसीमुळे मुलींच्या शिक्षणासाठी आग्रही असणाऱ्या आदिवासी समाजातील पालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे़
कळंब येथे आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह सुरू आहे़ हे वसतीगृह शेंडी (ता़अकोले जि़अहमदनगर) येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेवून शासनाने त्याची कार्यवाही सुरू केली आहे़ परंतू शासनाच्या या निर्णयामुळे येथे शिक्षण घेत असलेल्या अदिवासी समाजातील मुलींची मात्र, गैरसोय होणार आहे़ याबाबत सोलापूर येथील प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार वसतिगृहाच्या गृहपालांनी हे वसतीगृह गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू केली होती़ परंतू ९ आॅक्टोबर रोजी हे वसतीगृह हलविण्यास विरोध दर्शविल्यानंतर ही प्रक्रिया थांबली आहे़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच शैक्षणिक तसेच सामाजिक वर्तुळातूनही संस्था तसेच शासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे़