शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

महामॅरेथाॅनमुळे उद्या सकाळच्या वेळेत वाहतुकीमध्ये मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 19:26 IST

‘लोकमत’तर्फे २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन, १० किमीची पॉवर रन, ५ किमीची फन रन आणि ३ किमीची फॅमिली रन घेण्यात येईल.

औरंगाबाद :लोकमत’तर्फे आयोजित केलेल्या औरंगाबाद महामॅरेथॉनसाठी रविवारी (दि.१८) पहाटे ५ ते सकाळी ९.३० वाजेदरम्यान काही मार्गांवरील वाहतुकीमध्ये बदल केल्याची माहिती वाहतूक विभागाचे प्रभारी सहायक पोलिस आयुक्त दिलीप गांगुर्डे यांनी दिली.

लोकमत’तर्फे २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन, १० किमीची पॉवर रन, ५ किमीची फन रन आणि ३ किमीची फॅमिली रन घेण्यात येईल. महामॅरेथॉनची सुरुवात विभागीय क्रीडा संकुल येथून सुरू होऊन सूतगिरणी चौक, गजानन महाराज मंदिर, सेव्हन हिल, क्रांतीचौक, गोपाल टी, विटस हॉटेल चौक, रेल्वे स्टेशन रोड येथून यू-टर्न घेऊन विटस हॉटेलपासून देवगिरी महाविद्यालयामार्गे भाजीवालीबाई पुतळा, दर्गा चौकमार्गे विभागीय क्रीडा संकुल येथे येणार आहे. त्यामुळे या मार्गावर स्पर्धकांची संख्या मोठी असेल. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता, जीवितास धोका, अडथळा किंवा गैरसाेय होऊ नये, यासाठी वाहतुकीमध्ये बदल केला आहे.

रविवारी पहाटे ५ ते सकाळी ९.३० वाजेदरम्यान मॅरेथॉनच्या मार्गावरील डावी बाजू सर्व वाहतुकीस बंद असणार आहे. उजव्या बाजूने येणारी व जाणारी सर्व प्रकारची वाहतूक सुरू राहील. बंदोबस्तावरील अधिकारी आवश्यकतेनुसार वाहतूक वळवतील व मार्गात बदल करतील. ही अधिसूचना पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन व अत्यावश्यक वाहनांना लागू असणार नाही, असेही प्रभारी सहायक आयुक्त दिलीप गांगुर्डे यांनी सांगितले आहे.

३ कि.मी.विभागीय क्रीडा संकुलातून प्रारंभ होऊन सूतगिरणी चौक, के. पॉण्ड चौक (जवाहरनगर पोलिस ठाणे चौक), गजानन महाराज मंदिरापासून यू-टर्न घेऊन पुन्हा त्याच मार्गाने विभागीय क्रीडा संकुलात समारोप.

५ कि.मी.विभागीय क्रीडा संकुलातून सुरू होऊन सूतगिरणी चौक, के. पॉण्ड चौक, सेव्हन हिल चौक येथून यू-टर्न घेऊन क्युबा रेस्टॉरंट, गजानन महाराज मंदिरामार्गे विभागीय क्रीडा संकुलात समारोप होईल.

१० कि.मी.विभागीय क्रीडा संकुलातून प्रारंभ होऊन के. पॉण्ड चौक, गजानन महाराज मंदिर, सेव्हन हिल, मोंढा नाका, क्रांतीचौक, जय टॉवर, गोल्डी थिएटर येथून यू-टर्न घेऊन विटस हॉटेल, देवगिरी महाविद्यालय, भाजीवालीबाई चौक, दर्गा चौपाटीमार्गे विभागीय क्रीडा संकुलावर समारोप.

२१ कि.मी.विभागीय क्रीडा संकुल, के. पॉण्ड चौक, गजानन महाराज मंदिर, सेव्हन हिल, हॉटेल ग्लोबल, क्रांतीचौक, जय टॉवर, हॉटेल अशोकापासून यू-टर्न घेऊन हॉटेल विटस, देवगिरी महाविद्यालय, भाजीवालीबाई चौक, दर्गा चौक, रेमंड शो रूम आणि विभागीय क्रीडा संकुल या मार्गाने दोन राउंड.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादLokmatलोकमतMarathonमॅरेथॉन