उत्सव उद्योगाला मनपाचा झटका

By Admin | Updated: May 13, 2015 00:27 IST2015-05-13T00:19:10+5:302015-05-13T00:27:40+5:30

लातूर : लातूर औद्योगिक वसाहत परिसरात चार भूखंड एकत्रित करुन शहरातील चार डॉक्टर्सने उत्सव उद्योग या नावाने बांधकाम करीत असलेल्या इमारतीचा

A major blow to the celebration industry | उत्सव उद्योगाला मनपाचा झटका

उत्सव उद्योगाला मनपाचा झटका


लातूर : लातूर औद्योगिक वसाहत परिसरात चार भूखंड एकत्रित करुन शहरातील चार डॉक्टर्सने उत्सव उद्योग या नावाने बांधकाम करीत असलेल्या इमारतीचा बांधकाम परवाना लातूर महानगरपालिकेने रद्द केला आहे़ ११ मे रोजी मनपा आयुक्तांनी हा आदेश दिला असून, रद्द केलेला बांधकाम परवाना डॉ़ गिरीश मैंदरकर, डॉ़ मनिषा बिराजदार, डॉ़ संदीप कवठाळे व डॉ़ शिवाजी काळगे यांचा संयुक्त होता़
लातूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्था मर्यादीत लातूर येथे भूखंड क्ऱ ५६, ५७, ६२ व ६३ मध्ये वाणिज्य वापरासाठी बांधकाम परवान्याची मागणी होती़ अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे बांधकामासाठी परवानगी देण्यात आली होती़ परंतु, लातूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकांना उद्देशून जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी या चारही भूखंडाच्या एकत्रिकरणास उद्योग संचालनालयाची परवानगी नसल्याचे म्हटले होते़ शिवाय, भूखंडाचे अधिमुल्य भरणा शासनास केला नाही़ नियमानुसार हस्तांतरणात परवानगी घेतली गेली नाही़ त्यामुळे सदरील जागेवर बांधकाम करु नये, असे जिल्हा उद्योग केंद्राने कळविले़ संस्थेतील भूखंडामध्ये सेवा उद्योगासाठी नियमानुसार परवानगी घेतल्याचे दिसून आले नाही़ भूखंडावरील बांधकाम परवानगी रद्द किंवा फेरबदल का करु नये, असे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५१ अन्वये २४ एप्रिल २०१५ रोजी सुनावणी आयोजित केली होती़ या सुनावणीत दोन्ही बाजूचे म्हणणे विचारात घेऊन व कागदपत्राचे अवलोकन करुन औद्योगीक वसाहत सहकारी संस्थेतील भूखंड क्रमांक ५६, ५७, ६२, ६३ बांधकाम परवानगी प्रारंभ प्रमाणपत्रातील टिप अन्वये आपण भूखंड हस्तांतरणास शासनाची परवानगी न घेता व महाराष्ट्र प्रादेशिक, नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ अन्वये दिलेल्या बांधकाम परवानगी प्रारंभ प्रमाणपत्रामधील अटीचे उल्लंघन झाल्यामुळे आपणास अधिनियमानुसार दिलेले बांधकाम परवानगी रद्द करण्यात येत आहे, असे आदेश मनपा आयुक्तांनी ११ मे रोजी दिले आहेत़ या आदेशाच्या प्रति उत्सव उद्योगातील भागिदार डॉ़ गिरीश मैंदरकर, डॉ़ मनीषा बिराजदार, डॉ़ संदीप कवठाळे, डॉ़ शिवाजी काळगे यांनाही पाठविण्यात आले आहेत़
५६, ५७, ६२, ६३ या भूखंडावर कोणतेही बांधकाम चालू ठेवू नये, अन्यथा जागेवरील बांधकामावर अनधिकृत बांधकामाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असेही या आदेशात आयुक्तांनी म्हटले आहे़
दरम्यान, या प्रकरणी माहितीच्या अधिकारात पाठपुरावा करुन मल्लिकार्जून भाईकट्टी यांनी बांधकाम परवाना रद्द करण्याची मागणी केली होती़ (प्रतिनिधी)
मुंबई येथील उद्योग संचालनालयाकडे हस्तांतरणाच्या परवानगीचा प्रस्ताव सादर केला आहे़ त्यांच्या परवानगीची प्रतीक्षा आहे़ सध्या आमच्या बांधकामाला आयुक्तांनी स्थगिती दिली आहे़ आम्ही नियमबाह्य काहीच करणार नाही़ त्यामुळे सध्या बांधकाम बंद ठेवले आहे़ कायदेशीर परवानगी घेऊनच बांधकाम केले जाईल़ सदरील भूखंडांवर बांधकाम सुरु करण्यापूर्वी रितसर परवानगीच घेतली होती़ परंतु, मनपा आयुक्तांनी ही परवानगी रद्द केली आहे़ त्यामुळे आम्ही उद्योग संचालनालयाकडे परवानगी मागितली आहे, असे डॉ़ शिवाजी बडाप्पा काळगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़

Web Title: A major blow to the celebration industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.