शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

मका व्यापाऱ्याकडून २२ लाखांची फसवणूक, हतबल शेतकऱ्याने संपवले जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 20:20 IST

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : कमी दरात मका देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याने २२ लाख रुपये घेतले. मात्र, नंतर मका व पैसे दोन्ही न देता धाकदपटशाही केल्याने रघुनाथ उत्तम निकम (४१, रा. पिशोर) यांनी विष घेऊन आत्महत्या केली. १८ जून रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी शनिवारी दौलताबाद पाेलिस ठाण्यात राजू पुंजाजी पाडसवान (रा. पिंपरखेडा, कन्नड) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

रघुनाथ शेतीसह भुसार मालाचा व्यवसाय करत होते. यामुळे त्यांचे पाडसवानसोबत व्यवहार होत. २०२५ च्या सुरुवातीला पाडसवालने त्याच्या प्रणाली ट्रेडिंग कंपनीकडून कमी दराने मका देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी रघुनाथ यांनी मित्रांकडून उधार घेऊन त्याला २२ लाख रुपये दिले. एप्रिल महिन्यात रघुनाथ यांनी त्याला मका देण्याची विनंती केली. मात्र, पाडसवानने नकार दिला. शिवाय, २२ लाख रुपये घेतल्याचेच अमान्य केले. यामुळे रघुनाथ तणावात गेले. मित्रांचे २२ लाख परत करणे अशक्य होऊन मकाही न मिळाल्याने त्यांनी कुटुंबाकडे खंत व्यक्त केली होती.

१२ जून रोजी जाधववाडीत गेलेले रघुनाथ घरी परतलेच नाहीत. याप्रकरणी कुटुंबाने सिडको पाेलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता झाल्याची नोंद केली. त्यांचा शोध सुरूच होता. १५ जून रोजी त्यांचा भाचा राजेश जाधव व मामेभाऊ संतोष राऊतराव यांनी त्यांचा शरणापूर ते दौलतबाद रोडवर शोध घेण्यास सुरुवात केली. एका ढाब्यावरील व्यक्तीने त्यांच्या छायाचित्रावरून रघुनाथ पायी गेल्याची दिशा सांगितली. कुटुंबाने रस्त्यापासून काही अंतरावर शोध घेतला असता रघुनाथ एका झाडाखाली बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, १८ जून रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपनिरीक्षक सुनील बोडखे तपास करत आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीfarmer suicideशेतकरी आत्महत्या