शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल धर्माच्या नावावर मते मागितल्याचा मुख्य आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:35 AM

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या निवडीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. जलील यांचे प्रतिस्पर्धी तथा बहुजन महापार्टीचे पराभूत उमेदवार शेख नदीम शेख करीम यांनी ही याचिका दाखल केली.

ठळक मुद्दे एमआयएम पक्षप्रमुख व त्यांच्या भावाने हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारी भाषणे केल्याचा आरोप

औरंगाबाद : औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या निवडीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. जलील यांचे प्रतिस्पर्धी तथा बहुजन महापार्टीचे पराभूत उमेदवार शेख नदीम शेख करीम यांनी ही याचिका दाखल केली.एमआयएमचे पक्षप्रमुख खासदार असदोद्दीन ओवेसी आणि त्यांचे बंधू अकबरोद्दीन ओवेसी यांनी हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारी भाषणे केली असून, त्यांच्याविरुद्ध देशभरात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जलील यांनी धर्माच्या नावावर मते मागितल्याचा आक्षेप नदीम यांनी नोंदविला आहे. खा. जलील यांची निवड रद्द करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.शेख नदीम यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्यामार्फत निवडणूक याचिका दाखल केली आहे. त्यांनी राष्टÑीय निवडणूक आयोग आणि १९-औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांना प्रतिवादी केले आहे.याचिकेत म्हटल्यानुसार खा. जलील एआयएमआयएम पक्षातर्फे निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. त्यांचे पक्षप्रमुख खा.असदोद्दीन ओवेसी आणि त्यांचे बंधू अकबरोद्दीन ओवेसी यांची दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भाषणांची ‘यु-ट्यूब’वरून ‘डाऊनलोड केलेल्या ‘व्हिडिओ क्लीप’ याचिकेसोबत जोडल्या आहेत. जलील यांनी नामनिर्देशनपत्रासोबतच्या फॉर्म नंबर-२६ मध्ये खोटी माहिती सादर केली आहे. त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा क्रमांक ६०/२०१६ ची माहिती त्यांनी लपविली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान मुस्लिम समाजातील राजकीय नेत्यांच्या छायाचित्रांसह काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुभाष झांबड यांचे छायाचित्र असलेल्या हस्तपत्रिका वाटण्यात आल्या.खा. जलील हे मुस्लिम आहेत, त्यांना मतदान करण्याचे आवाहन ‘व्हॉटस्अ‍ॅप’ ग्रुपवर मुस्लिम समाजाला करण्यात आले होते. याबाबत याचिकाकर्त्याने १८ एप्रिल २०१९ रोजी निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रार केली असल्याचे याचिकेत म्हटले आहे. तसेच जलील यांनी आफताब खानच्या सांगण्यावरून सय्यद महंमद अली हाश्मी नावाच्या अल्पवयीन मुलाची जलील यांना मतदान करण्याचे आवाहन करणारी व्हिडिओ क्लीप जारी केल्याचे म्हटले आहे. जलील यांच्या सहकाºयांनी औरंगाबाद जिल्ह्यातील मशिदींमध्ये बैठका घेऊन जलील यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. याचिकाकर्त्याने १२ जून आणि २७ मे २०१९ रोजी याबाबत सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जलील यांनी १० ते १६ एप्रिल २०१९ दरम्यान धनादेशाऐवजी रोखीने ८२ हजार १२० रुपये रोख खर्च केले हे निवडणूक नियमाविरुद्ध असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Courtन्यायालय