प्रेमाची वाच्यता होण्याच्या भीतीने युवतीची आत्महत्या
By Admin | Updated: July 6, 2014 00:14 IST2014-07-06T00:08:33+5:302014-07-06T00:14:28+5:30
किनवट : प्रेमसंबंधांची गावात वाच्यता होऊन आपली बदनामी होईल, या भीतीपोटी १६ वर्षीय युवतीने विष पिवून आत्महत्या केल्याची घटना डोंगरगाव ता. किनवट येथे घडली.

प्रेमाची वाच्यता होण्याच्या भीतीने युवतीची आत्महत्या
किनवट : प्रेमसंबंधांची गावात वाच्यता होऊन आपली बदनामी होईल, या भीतीपोटी १६ वर्षीय युवतीने विष पिवून आत्महत्या केल्याची घटना डोंगरगाव ता. किनवट येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
यशोदाबाई संभाजी मेटकर (वय १६) असे मयत युवतीचे नाव आहे. गावातील श्रीहरी वैजनाथ शेळके (वय २०) या युवकासोबत तिचे प्रेमसंबंध होते. दोघे काही काळ घर सोडून निघून गेले होते. परत आल्यावर मुलीचे वडील संभाजी मेटकर यांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींची बैठक बोलाविली, या बैठकीस श्रीहरीलाही बोलाविण्यात आले होते. मात्र तो आला नाही. ही माहिती यशोदाबाईला कळाली व आपली बदनामी होईल, श्रीहरीसोबत लग्न होणार नाही, या भीतीने मनावर परिणाम होवून यशोदाबाईने विष प्राशन केले. अधिक उपचारासाठी तिला आदिलाबाद येथे हलविण्यात आले, तेथे ती मरण पावली.
ही घटना १६ मार्च २०१४ रोजी सकाळी ६ वाजता घडली. माझ्या मुलीच्या आत्महत्येला आरोपी श्रीहरी वैजनाथ शेळके व अन्य दोघे जबाबदार असल्याचा आरोप वडील संभाजी मेटकर यांनी ५ जुलै रोजी किनवट पोलिस ठाण्यात केला. त्यावरुन पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. सहा. पोलिस निरीक्षक नंदकिशोर शेळके तपास करीत आहेत. (वार्ताहर)
नाईक जयंती साजरी
किनवट : गोकुंदा येथील कै. आ. सुभाष जाधव प्रा. शाळेत कै. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी भाऊराव जाधव, नथूराम भगत, बी.एन. बुले, जाधव उपस्थित होते.सूत्रसंचालन पी.झेड. भोयर यांनी तर शेकापुरे मॅडम यांनी आभार मानले.