कृषीनगरात युवतीची आत्महत्या
By Admin | Updated: March 20, 2016 23:39 IST2016-03-20T23:33:27+5:302016-03-20T23:39:14+5:30
परभणी : शहरातील कृषीनगर येथील एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १९ मार्च रोजी घडली़

कृषीनगरात युवतीची आत्महत्या
परभणी : शहरातील कृषीनगर येथील एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १९ मार्च रोजी घडली़
यासंदर्भात पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृषीनगर येथील वर्षा ऊर्फ माधुरी सोपान सिरसाठ या युवतीने शनिवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली़ या प्रकरणी सोपान सिरसाठ यांच्या खबरीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे़ माझे आताच लग्न करू नये, या कारणावरून तिने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली़ कोतवाली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश ठाकूर, जमादार बाबूराव धबडे तपास करीत आहेत़ (प्रतिनिधी)