माहुरात चैत्र नवरात्रोत्सवाची उत्साहात सांगता

By Admin | Updated: April 20, 2016 23:50 IST2016-04-20T23:48:52+5:302016-04-20T23:50:54+5:30

श्रीक्षेत्र माहूर : येथील रेणुकामाता मंदिरात चैत्र नवरात्रोत्सव पार पडला़ यानिमित्ताने भाविकांसाठी विविध सोयीसुविधा करण्यात आल्या़

Mahurat tells Chaitra Navratri festival | माहुरात चैत्र नवरात्रोत्सवाची उत्साहात सांगता

माहुरात चैत्र नवरात्रोत्सवाची उत्साहात सांगता

श्रीक्षेत्र माहूर : येथील रेणुकामाता मंदिरात चैत्र नवरात्रोत्सव पार पडला़ यानिमित्ताने भाविकांसाठी विविध सोयीसुविधा करण्यात आल्या़
जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यंदापासून माहुरात नवरात्रोत्सवाप्रमाणे चैत्र नवरात्रोत्सव घेण्याचे ठरविण्यात आले़ बैठकीला सचिव डॉ़ राजेंद्र भारूड, उपाध्यक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी आऱ के़ खरात, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार डॉ़ आशिषकुमार बिरादार, विश्वस्त तथा पूजारी चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, भवानीदास भोपी, विनायकराव फांदाडे, समीर भोपी, श्रीपाद भोपी, आशिष जोशी, पी़ डी़ चव्हाण, प्रकाश सरोदे उपस्थित होते़ पहिल्या दिवशी रेणुकामातेची नित्यपूजा होवून घटस्थापना झाली़ यानंतर अलंकार चढवून देवीची महापूजा करण्यात आली़ ९ दिवसात विविध कार्यक्रम पार पडले़
यात आरती, महाप्रसाद, जागरण, संगीतसेवा, छबिना, कुमारिका पूजन, सुहासिनी पूजन, महाकाली देवी पूजन, परिवार देवता पूजन, देवता स्थापन, यज्ञ, होमहवन आदी कार्यक्रम पार पडले़ १५ एप्रिल रोजी आनंद यावलकर यांच्या हस्ते यज्ञाची पूर्णाहुती, आरती, महाप्रसादाने समाप्ती झाली़ भाविकांची मोठी गर्दी झाली होती़
महाप्रसाद, पिण्याचे शुद्ध पाणी आदींची मुबलक व्यवस्था झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले़ (वार्ताहर)

Web Title: Mahurat tells Chaitra Navratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.