माहूर रेणुका माता मंदिरात जयघोषात घटस्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:23 IST2017-09-22T00:23:13+5:302017-09-22T00:23:13+5:30

शहरातील गडावर असलेल्या श्री रेणुकामाता मंदिरात शारदिय नवरात्रोत्सवात भक्तीमय वातावरणात घटस्थापना करुन सुरूवात झाली.

Mahur Renukka Mata temple collapses in Jaipur | माहूर रेणुका माता मंदिरात जयघोषात घटस्थापना

माहूर रेणुका माता मंदिरात जयघोषात घटस्थापना

लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीक्षेत्र माहूर : शहरातील गडावर असलेल्या श्री रेणुकामाता मंदिरात शारदिय नवरात्रोत्सवात भक्तीमय वातावरणात घटस्थापना करुन सुरूवात झाली.
जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विश्वस्त समितीचे अध्यक्ष सुधीर कुलकर्णी यांच्या हस्ते महाआरती कुमारिका पुजनही संपन्न झाले. घटस्थापनेच्या दिवशीच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्निक पुजा केली. सोबतच दुपारी शिवसेनेचे आ़ हेमंत पाटील यांनीही मातेचे दर्शन घेतले.
शारदिय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी अध्यक्ष सुधीर कुलकर्णी, उपाध्यक्ष आसाराम जहारवाल, सचिव नरेंद्र देशमुख, कोषाध्यक्ष सिद्धेश्वर वरनगांवकर, विश्वस्त विनायकराव फांदाडे, चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, भवानीदास भोपी, सामेर भोपी, श्रीपाद भोपी, आशिष जोशी यांच्या उपस्थितीत विधीवत मातेची पूजा करुन अलंकार पैठणी महावस्त्र चढवून महाआरती करुन भाविकांसाठी महाप्रसाद सुरू करण्यात आला.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पहाटे ५ वाजेपासूनच भाविक श्री रेणुका मातेच्या दर्शनार्थ रांगेत उभे होते. देवस्थानकडून भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, महाप्रसाद, सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रतिपदा निमित्त प्रसिद्ध सनईवादक निमित्त धुमाळ यांच्या सुमधूर सनई वादनाने वातावरण आणखीनच भक्तीमय झाले होते. स.पो.अ. अविनाश बारगळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पो.नि. अभिमन्यू साळंके, सपोनि शिवप्रकाश मुळे, पो.उप.नि. अनंतसिंह चौहाण, धावारे यांने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. डी.एम. धूतमल यांनी गडावर नेण्यासाठी पुरेशा एस.टी. बसेस सज्ज ठेवल्याने भाविकांना दर्शन सोयीचे झाले.
किनवट येथील प्रसिद्ध, कृष्णप्रिय गोशाळा यांचेकडून आलेल्या ३५ हजारांवर भाविकांना मोफत महाप्रसाद स्वच्छ पाणी, शहरातील टी पॉइंट येथे दरवर्षी प्रमाणे दिले गेल्याने भाविकांतून समाधान व्यक्त केले जात होते.

Web Title: Mahur Renukka Mata temple collapses in Jaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.