शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'फुले- आंबेडकरांनी भीक मागून शाळा चालवल्या'; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने वाद, लगेच खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 18:19 IST

राज्यातील  भाजप नेत्यांकडून महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. त्यात चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची भर पडली आहे.

औरंगाबाद: राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरील वाद अजूनही सुरूच आहे, तोच आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्याने वादाला तोंड फूटले आहे. या देशात कर्मवीर भाऊराव पाटील- महात्मा फुले- बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शाळा चालवल्या, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री पाटील यांनी केले आहे. यावरून आता सर्वत्र टीका होत आहे. 

राज्यातील  भाजप नेत्यांकडून महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. त्यात चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची भर पडली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित पैठण येथील संतपीठाचा पहिला प्रमाणपत्र वितरण सोहळा आज पार पडला. यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी अध्यक्षस्थानी होते. यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे रोहयो व फलोत्पादन मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, संतपीठाचे समन्वयक डॉ.प्रवीण वक्ते आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, तुम्ही अनुदानावर अवलंबून का रहाता? या देशामध्ये शाळा कुणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सगळ्यांनी शाळा सुरू केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरू करायच्या आहेत, आम्हाला पैसे द्या. त्याकाळी दहा रुपये द्यायचे. आता दहा-दहा कोटी रुपये देणारे आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. 

मंत्री पाटील यांनी केला खुलासा दरम्यान, यावर मंत्री पाटील यांनी यावर खुलासा केला आहे. त्याकाळी वापरातील माधुकरी म्हणजे काय? हा प्रचलित शब्द आहे. भीक मागून संस्था चालवल्या असे म्हटले जाते. मी त्याबाबत भाषणात पुढे सीएसआर शब्द वापरला आहे, असा बचाव मंत्री पाटील यांनी केला आहे. तसेच माझ्या भाषणात कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल कौतुकच केले आहे, असेही ते म्हणाले.  

वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाचऔरंगाबादेतच काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘शिवाजी तो पुराने जमाने की बात है,’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यापूर्वी त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून निर्माण झालेला वाद अजून शमलेला नाही. राज्यपाल हटावच्या मागणीसाठी १७ डिसेंबरला महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याची त्यात भर पडली आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलAurangabadऔरंगाबादBJPभाजपा