शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मेहमूद गेटचे अवशेष निखळले; इतिहासतज्ज्ञांचा महापालिकेवर रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 13:52 IST

जगप्रसिद्ध पाणचक्कीसमोरील मेहमूद दरवाजाचे अवशेष शुक्रवारी सकाळी ७ वाजता निखळले.

ठळक मुद्देदरवाजाच्या आतील भागात असलेले लाकडी गेट अचानक निखळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

औरंगाबाद : जगप्रसिद्ध पाणचक्कीसमोरील मेहमूद दरवाजाचे अवशेष शुक्रवारी सकाळी ७ वाजता निखळले. दरवाजाच्या आतील भागात असलेले लाकडी गेट अचानक निखळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शहरात ५२ दरवाजांपैकी केवळ १४ दरवाजे शिल्लक राहिले आहेत. महापालिका प्रशासन या ऐतिहासिक दरवाजांकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाताहत होत असल्याचा आरोप इतिहासतज्ज्ञांनी केला. 

पाणचक्कीच्या दर्शनी भागातच मेहमूद दरवाजा मागील ३५० वर्षांपासून दिमाखात उभा आहे. जगप्रसिद्ध पाणचक्की पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना याच दरवाजातून पुढे जावे लागते. खाम नदीवरील हा बुलंद दरवाजा पर्यटकांसाठीही आकर्षण केंद्र आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजता दरवाजातून नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू असताना अचानक आतील लाकडी १५ फूट उंच आणि ८ फूट रुंद दरवाजा कोसळला. त्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. सुदैवाने जेव्हा हा दरवाजा कोसळला तेव्हा गेटमधून एकही वाहन ये-जा नव्हती. नागसेनवन व विद्यापीठ परिसरात जाणारे विद्यार्थी तसेच कंपनीच्या कामगारांची सकाळी याच गेटमधून वर्दळ असते.

गेटच्या आतील भागातच लाकडी दरवाजा कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. शालेय विद्यार्थ्यांना मार्ग बदलून जावे लागले. सकाळी शासकीय कार्यालयांना ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांनाही मार्ग बदलून जावे लागले. सकाळी १० वाजता अग्निशमन दलाने लाकडी गेट बाजूला केल्यानंतर गेटमधील वाहतूक सुरळीत झाली. महापालिकेने यापूर्वीच दरवाजांकडे लक्ष दिले असते तर आज ही वेळच आली नसती, असा आरोप इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख, डॉ. दुलारी कुरैशी आदींनी केला आहे. 

मनपाने युद्धपातळीवर दुरुस्ती करावीशहरातील मोजक्याच आणि शिल्लक राहिलेल्या दरवाजांकडे महापालिकेने नेहमीच दुर्लक्ष केले. त्यामुळे एकानंतर एक ऐतिहासिक गेट नामशेष होत आहेत. शुक्रवारी सकाळी महेमूद दरवाजातील लाकडी भाग सागवानाचा आहे. पावसाच्या पाण्यामुळे खालील भाग पूर्णपणे सडला होता. त्यामुळे दरवाजा निखळला. महापालिकेने युद्धपातळीवर दरवाजा जशास तसा दुरुस्त करून बसवावा. गेटमधील दुसऱ्या बाजूचा लाकडी दरवाजाही पडू नये म्हणून मनपाने दुरुस्ती सुरू करावी.

जीव जाण्याची वाट पाहताय का?मेहमूद दरवाजाला तडे गेले आहेत. त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे, ही बाब महापालिकेच्या निदर्शनास अनेकदा आणून दिली आहे. मनपाने गेटच्या दोन्ही बाजूने पूल उभारून रस्ता करण्याची योजना आखली आहे. त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही. उद्या गेट पडून निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यावर महापालिका डागडुजी करणार आहे का?- डॉ. दुलारी कुरैशी, इतिहास व पर्यटनतज्ज्ञ

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाRainपाऊस