माहेश्वरींनी घडविले भक्ती, शिस्तीचे दर्शन

By Admin | Updated: June 14, 2016 00:09 IST2016-06-13T23:58:39+5:302016-06-14T00:09:32+5:30

औरंगाबाद : महेश नवमीनिमित्त सोमवारी सायंकाळी अपार उत्साहात निघालेल्या शोभायात्रेतून माहेश्वरी समाजाने भक्ती, शिस्तीचे दर्शन घडविले.

Maheshwari created the philosophy of devotion and discipline | माहेश्वरींनी घडविले भक्ती, शिस्तीचे दर्शन

माहेश्वरींनी घडविले भक्ती, शिस्तीचे दर्शन

औरंगाबाद : महेश नवमीनिमित्त सोमवारी सायंकाळी अपार उत्साहात निघालेल्या शोभायात्रेतून माहेश्वरी समाजाने भक्ती, शिस्तीचे दर्शन घडविले. समाजबांधवांनी केलेल्या ‘ओम नम: शिवाय’च्या मंत्रजपाने शहरातील वातावरण मंगलमय झाले होते. महेश नवमीनिमित्त सकाळी खडकेश्वर मंदिरात अशोक खटोड, अनिल बाहेती, सुनील खटोड व पवन काळे दाम्पत्यांच्या हस्ते महादेवाला रुद्राभिषेक करण्यात आला. सायंकाळी ५ वाजता लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी खडकेश्वर मंदिरात आरती करून शोभायात्रेला हिरवा झेंडा दाखविला.
‘जय महेश’ असा जयघोष करीत अपार उत्साहात शोभायात्रेला सुरुवात झाली. अग्रभागी पाच युवक सजविलेल्या घोड्यावर स्वार झाले होते. भवानीनगरातील आदर्श महिला भजनी मंडळ व शिवशंकर कॉलनीतील शिवपार्वती महिला भजनी मंडळातील महिला भजन म्हणण्यात तल्लीन झाल्या होत्या. कांता फसाटे, भागुबाई साळुंके या महिलांनी भजने गात शोभायात्रेत रंगत आणली. ट्रॅक्टरवर शंकर भगवंतांचे मोठे कटआऊट होते. अश्वरथावरील शंकर-पार्वतीचा सजीव देखावा लक्ष वेधत होता. तन्वी करवा हिने शंकराची तर प्रिया कलंत्रीने पार्वतीची वेशभूषा केली होती. बँडपथकातील कलाकार गीत सादर करीत होते.
शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे माहेश्वरी समाजबांधव रांगेत चालत होते. यामुळे एका बाजूने वाहतूकही सुरळीत चालू होती. पुरुषांनी पांढऱ्या रंगातील कुर्ता पायजमा तर महिलांनी लाल-पिवळ्या रंगातील साड्या परिधान केल्या होत्या. शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. खडकेश्वर मैदान येथून निघालेली शोभायात्रा औरंगपुरा, गुलमंडी, टिळकपथ, पैठणगेट मार्गे ६.३० वाजता तापडिया नाट्यमंदिरात पोहोचली. नाट्यमंदिरात माहेश्वरी मंडळातर्फे सर्वांचे स्वागत करण्यात येत होते. शोभायात्रा मार्गावर श्रमपरिहारासाठी आईस्क्रीम, शीतपेये आदींची व्यवस्था करण्यात आली होती.
शोभायात्रेत सर्वात शेवटी कचरा वेचणारे पथक चालत होते. रिकामे आईस्क्रीमच्या वाट्या, शीतपेयांचे ग्लास समाजबांधव त्या कॅरिबॅगमध्ये टाकीत होते. शोभायात्रेतून सर्वांनी स्वच्छतेचे दर्शनही घडविले. शोभायात्रेत माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष अनिल सोनी, संजय सारडा, शिवप्रसाद तोतला, विनयकुमार राठी, समन्वय समितीप्रमुख संतोष लखोटिया, काशीनाथ दरख, प्रभाग कोषाध्यक्ष महेश लखोटिया, नंदकिशोर मालपाणी, पंकज फुलपगर, उदयकुमार तोतला, नितीन भक्कड, संजय राठी, डॉ.सुभाषचंद राठी, संदीप नागोरी, श्रीकांत मिनियार, अनिल बाहेती, संजय मंत्री, प्रफुल्ल मालानी, संजय दरख, मुकुंद गट्टाणी, नरेश सिकची, चंद्रकांत मालपाणी, ललित राठी, घनश्याम रांदड, सी. एस. सोनी, अ‍ॅड. सुभाष मालानी, डॉ. रमेश लड्डा, जितेंद्र झंवर, आशुतोष नावंदर, उमेश राठी, सतीश लड्डा, राहुल मालानी, किशोर सिकची, अ‍ॅड. रामकिशन बाहेती, श्याम सोमाणी, योगेश मालानी, शिवनाथ राठी, भगवान सिकची, कमलकिशोर लड्डा, रमेश सोनी, सतीश लड्डा, सुनील मालानी, ईश्वर चिचाणी, संजय सिकची, निखिल करवा, पवन बजाज, छाया धूत, योगिता करवा, सुनेत्रा हेडा, अ‍ॅड. रेखा लड्डा, मनीषा सोनी, किरण लखोटिया, शोभा बागला, रेखा मालपाणी, डॉ. सीमा लखोटिया, ज्योती राठी, वीणा मालपाणी, रेखा राठी, मनीषा तोतला, अर्चना भट्टड सहभागी झाले.
खडकेश्वर मैदानासमोरील चौकात महेश चौक असे नाव देण्यात आले आहे. या ठिकाणी आकर्षक स्तंभ उभारण्यात आला आहे.
४महेश चौकाचे लोकार्पण महापौर त्र्यंबक तुपे यांच्या हस्ते झाले. यावेळी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते विविधरंगी फुगे हवेत सोडण्यात आले.
४प्रदीप जैस्वाल, नंदकुमार घोडेले, प्रफुल्ल मालानी, भिकचंद चिचाणी, किशोरीलाल धूत,
राधावल्लभ धूत, जुगलकिशोर तापडिया, अध्यक्ष अनिल सोनी, संतोष लखोटिया, नितीन भक्कड, दिलीप सारडा यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
लोकार्पण सोहळ्यानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
बुलेट रॅलीने लक्ष वेधले
१०० युवकांनी बुलेट रॅली काढली होती. प्रत्येक बुलेटसमोर भगवा ध्वज लावण्यात आला होता. ‘जय महेश’ असा जयघोष करीत युवक बुलेट चालवत होते.
लक्षवेधी देखावा... महेश नवमीनिमित्त तापडिया नाट्यमंदिरात सायंकाळी आयोजित विशेष कार्यक्रमात रंगमंचावर वरील देखावा लक्षवेधी ठरला. भगवान रामाने शिवाची आराधना केली. ते क्षेत्र ‘रामेश्वर धाम’ने ओळखले जाऊ लागले. त्याच रामेश्वर धामचा देखावा करण्यात आला होता.
आकर्षक रांगोळी : महेश नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देणारी रांगोळी तापडिया नाट्यमंदिरात काढण्यात आली होती. शंकर भगवंतांच्या जटेतून गंगा वाहताना दाखविण्यात आली. ही रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरली. संगीता धूत व पूनम मालानी यांनी ही रांगोळी साकारली होती.
गाडीला मालानी यांनी मुलीचे रूप दिले होते. ‘बेटी बचाओ’असा संदेश याद्वारे देण्यात आला. तापडियानगरमध्ये मागील दोन वर्षांपासून स्वच्छता अभियान राबविणारे जमुना व राजेश मानधने यांनीही आपल्या कारला असे सजविले होते की, त्यातून स्वच्छता अभियानचा संदेश सर्वांना देण्यात आला. पुष्पा लड्डा यांनीही कारला आकर्षकरीत्या सजविले होते. सजावटीतून ‘बेटी बचाओ’ असा संदेश देण्यात आला. या कारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
माहेश्वरी प्रगती महिला मंडळाच्या वतीने तापडिया नाट्यमंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात १०१ जणांनी रक्तदान केले. त्यातही ६० महिलांनी रक्तदान केले. रक्तसंकलनाचे कार्य लायन्स क्लब रक्तपेढी व दत्ताजी भाले रक्तपेढीच्या वतीने करण्यात आले. यशस्वीतेसाठी प्रकल्पप्रमुख पुष्पा लड्डा, ज्योती गिल्डा, प्रमिला काबरा प्रयत्नशील होत्या. शिबीर यशस्वीतेसाठी अध्यक्षा मीना नावंदर, माधुरी धुप्पड, तारा सोनी, पुष्पा बाहेती, भारती जाजू, स्मिता मुंदडा यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Maheshwari created the philosophy of devotion and discipline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.