शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
4
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
5
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
6
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
7
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
8
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
9
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
10
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
11
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
12
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
13
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
14
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
15
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
16
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
17
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
18
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
19
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
20
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...

कुरुपतेला सौंदर्य प्रदान करणारा महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 23:42 IST

लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद चिकलठाणातर्फे आयोजित मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा सोमवारी समारोप झाला. कुरुपतेला स्वरूपतेत बदलणारा महायज्ञ ठरले

ठळक मुद्देलायन्स प्लास्टिक सर्जरी शिबीर : ३८२ शस्त्रक्रिया, कोणाला मिळाले सौंदर्य, कोणाला मिळाली वाचा

औरंगाबाद : लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद चिकलठाणातर्फे आयोजित मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा सोमवारी समारोप झाला. कुरुपतेला स्वरूपतेत बदलणारा महायज्ञ ठरलेल्या या शिबिरामुळे काहींचे दुभंगलेले ओठ जुळले, तर काहींची जुळलेली बोटे वेगळी झाली. चेहऱ्यावरील व्रण दूर होऊन काहींना सौंदर्य मिळाले, तर चिटकलेली जीभ वेगळी होऊन काही जणांना वाचाही मिळाली.डॉ. शरदकु मार दीक्षित यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद चिकलठाणातर्फे एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे १३ डिसेंबरपासून प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी अमेरिकेहून आलेले डॉ. राज लाला, डॉ. संजय लाला, डॉ. ललिता लाला, डॉ. ओम अग्रवाल, डॉ. अमित बासनवार यांच्यासह अन्य डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून रुग्णांना नवीन आयुष्य दिले. शिबिरात दुभंगलेले ओठ, जुळलेली बोटे, पडलेली पापणी, व्रण आदींसंदर्भातील १४ डिसेंबर रोजी ८७, १५ डिसेंबर रोजी ७१, १६ डिसेंबर रोजी १०३ तर १७ डिसेंबर रोजी ९९ शस्त्रक्रिया झाल्या, तर याव्यतिरिक्त तिरळेपणाच्या एकूण २२ शस्त्रक्रिया झाल्या. चार दिवसांत तब्बल ३८२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करून एकप्रकारे नवे जीवन देण्यात आले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी लायन्सचे अध्यक्ष सुरेश साकला, प्रकल्प प्रमुख राजेश लहुरीकर, सचिव डॉ. मनोहर अग्रवाल, भूषण जोशी, कल्याण वाघमारे, विनोद चौधरी, भरत भालेराव, राजकुमार टिबडीवाला, जयकुमार थानवी, मोहन हिंपलनेरकर, एम. टी. काझी,औरंगाबाद ड्रगिस्ट केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर, किशोर अग्रवाल, सतीश ठोले आदींसह एमजीएम येथील डॉक्टरांनी प्रयत्न केले.जेवणही करता येत नव्हतेचिंचोली (परतूर) येथील आदेश सरोदे या पाचवर्षीय मुलाचे जन्मापासून दोन्ही हाताची बोटे जुळलेली होती. त्यामुळे अनेक बाबींसह स्वत:च्या हाताने जेवणही तो करू शकत नव्हता. शिबिरात शस्त्रक्रिया करून त्याच्या उजव्या हाताची बोटे मोकळी करण्यात आली. त्यामुळे यापुढे तो स्वत:च्या हाताने जेवू शकेल, याचा आनंद त्याच्या कुटुंबियाच्या चेहºयावर दिसत होता. शहरातील बारी कॉलनीतील तीनवर्षीय अफशान शेख रिजवान याची जीभ जन्मजातच चिटक लेली होती. त्यामुळे तीन वर्षे होऊनही तो बोलू शकत नव्हता. शिबिरात शस्त्रक्रिया झाल्यामुळे तो आता बोलू शकेल, याचा आनंद त्याच्या कुटुंबियाचा गगनात मावत नव्हता....आता लग्न जुळणारलहानपणी मुलीच्या चेहºयाला कुत्र्याने चावा घेतला. मुलगी मोठी झाली तरी त्याचा व्रण कायम राहिला. त्यामुळे मुलीचे लग्न जुळण्याची चिंता पालकांना सतावत होती. शिबिरामुळे हा व्रण दूर झाल्याने मुलीचे लग्न जुळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, असे तिचे कुटुंबीय म्हणाले. 

टॅग्स :Healthआरोग्यdocterडॉक्टरAurangabadऔरंगाबाद