डिजीटल शाळांवर महावितरणची टांगती तलवार
By Admin | Updated: March 17, 2017 00:35 IST2017-03-17T00:33:08+5:302017-03-17T00:35:20+5:30
वालसावंगी :जिल्हा परिषदेच्या शाळांवर विशेषत: डिजीटल शाळांवर सध्या वीजबिल थकल्यामुळे अनेक शाळांची वीज पुरवठा खंडित करण्याची टांगती तलवार आहे.

डिजीटल शाळांवर महावितरणची टांगती तलवार
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी परिसरातील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळांवर विशेषत: डिजीटल शाळांवर सध्या वीजबिल थकल्यामुळे अनेक शाळांची वीज पुरवठा खंडित करण्याची टांगती तलवार आहे.
सध्या मार्चअखेर असल्याने महावितरणने थकीत वीजबिल भरा अन्यथा पुरवठा खंडित केला जात आहे. त्यातच जि.प. शाळांना वीजबील भरण्याकरीता कुठलाच निधी उपलब्ध नाही.
यामुळे शाळेचे थकित वीजबील कसे व कोठून भरावे, असा प्रश्न संबंधित मुख्याध्यापकांसमोर आहे. तालुक्यात अनेक शाळा असून, सर्वच शाळांवर वीजपुरवठा खंडित होण्याची टांगती तलवार आहे. एकीकडे जिल्हा परिषदेचे आदेश आहेत की शाळा डिजीटल करा तर दुसरीकडे मात्र, विजेअभावी डिजीटल शाळा होणे अशक्य दिसत आहे.
त्यातच आता महावितरणची वसुली मोहीम सुरू आहे. थकबाकी न भरल्यास संबंधित शाळेचा वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. यामुळे डिजीटल शाळांसमोर मोठा प्रश्न उभा आहे. (वार्ताहर)