शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाकाठी महावितरणला कोट्यवधीचा चूना

By admin | Updated: January 21, 2015 01:09 IST

बीड : महावितरण थकबाकीच्या भोवऱ्यात असतानाच ट्रान्सफर्मरच्या दुरुस्तीे व खराबीमध्ये वाढच होत आहे. गतवर्षापासून बीड मंडळातील दोन हजारांवर ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाला आहे.

बीड : महावितरण थकबाकीच्या भोवऱ्यात असतानाच ट्रान्सफर्मरच्या दुरुस्तीे व खराबीमध्ये वाढच होत आहे. गतवर्षापासून बीड मंडळातील दोन हजारांवर ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाला आहे. तर अधिकच्या काळाचा वापर झाल्याने ५५० ट्रान्सफार्मर जळून खाक झाले आहेत. त्यामुळ दुरूस्ती आणि नवीन ट्रान्सफार्मरवर महावितरणला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत.दरवर्षी रबी हंगामातील पिके पाण्याला आल्यास ट्रान्सफार्मरवर अतिरिक्त भार येत असतो. या काळात शेतीपंप ग्राहक अनधिकृतपणे अतिरिक्त विद्युत पंपाचा वापर करतात. परिणामी ट्रान्सफार्मर अतिरिक्त भार येऊन त्यामध्ये बिघाड होतो.वीजग्राहकांची मानसिकता नसल्याने दिवसेंदिवस थकबाकीत वाढ होत आहे. तर दुसरीकडे नवीन ट्रान्सफार्मर व त्याच्या दुरूस्तीसाठीचा खर्च महावितरणला करावा लागत आहे. परिमंडळातील उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांपेक्षा बीड जिल्ह्यातील ट्रान्सफार्मर जळण्याची खराब होण्याचे अधिक प्रमाण आहे. बीड मंडळातील आष्टी, पाटोदा, गेवराई आदी तालुक्यांत ट्रान्सफर्मर अधिक खराब होतात. यंदाच्या हंगामात ५० केव्ही चे १२, ६३ केव्ही चे १०८०, १०० केव्हीचे ७८२ तर २०० केव्हीच्या ६३ ट्रान्सफर्मरची दुरूस्ती करण्यात आली आहे. सर्वाधिक ६३ केव्हीच्या १०८० ट्रान्सफर्मरची दुरूस्ती करण्यात आली असून प्रत्येकी १८००० रुपयांचा खर्च महावितरण कंपनीला करावा लागला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ६३ केव्हीच्या ट्रान्सफार्मरचा वापर केला जात असल्याने खराबीचे प्रमाणही याच ट्रान्सफार्मरचे अधिक आहे. (प्रतिनिधी)