शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

बकोरियांची पाठ फिरताच महावितरणची घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 8:41 PM

सहव्यवस्थापक संचालकपदी ‘आयएएस’ दर्जाचा अधिकारी हवा

औरंगाबाद : महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांची दीड महिन्यापूर्वी बदली झाल्यानंतर शहरातील महावितरणची सेवा ढेपाळली आहे. शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, ग्राहकांच्या तक्रारी ऐकून न घेणे, चुकीची बिले अदा करणे, अभियंते- कर्मचाऱ्यांची मनमानी वाढणे, बदली केलेल्या कामचुकार अभियंते- कर्मचाऱ्यांना पुन्हा शहरात सोयीच्या ठिकाणी पदस्थापना देण्याचे प्रकार वाढले आहेत. 

दोन वर्षांपूर्वी महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी ओम प्रकाश बकोरिया यांची नेमणूक झाली. सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी कामचुकार अभियंते- कर्मचाऱ्यांवर कारवाईचा दंडुका उगारला. त्यामुळे महावितरणच्या कारभाराला बरीच शिस्त आली होती. दोन वर्षांत शहराच्या वीज वितरण सेवेत आमूलाग्र सुधारणा झाल्या होत्या. आता किरकोळ पावसातही वीजपुरवठा खंडित होत आहे. महावितरणने केलेल्या मान्सूनपूर्व कामांचे पितळ महिनाभरातच उघडे पडले. पाऊस नसतानाही अनेक वसाहतींमध्ये रोज रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज ग्राहक यासंबंधी अभियंत्यांना फोन करतात; परंतु अभियंते किंवा कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. 

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. याप्रकरणी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी कार्यकारी अभियंत्यास निलंबित केले. मात्र, त्यानंतरही फारशी परिस्थिती सुधारलेली नाही. सातत्याने याठिकाणचा वीजपुरवठा खंडित होत आहे. महावितरणने केंद्रीय वीज बिल प्रणाली स्वीकारली आहे. यामुळे अचूक व वेळेवर वीज बिल मिळेल, असा दावा कंपनीने केला होता. मात्र, स्थानिक प्रशासनाने या ग्राहकोपयोगी प्रणालीलाच हरताळ फासला आहे. चुकीचे मीटर रीडिंग अथवा रीडिंग न घेताच ग्राहकांना बिले मिळत आहेत. यावर मीटर रीडिंग एजन्सीवर कडक कारवाई करण्यात महावितरण हयगय करीत आहे. अनेक भागांत ग्राहकांना वेळेवर बिल मिळत नाही, त्यामुळे ग्राहकांना लेट पेमेंटचा भुर्दंड बसत आहे. चुकीच्या रीडिंगबाबत महावितरण फेरपडताळणी करण्याचा देखावा करीत आहे. मात्र त्यातूनही ठोस काही निष्पन्न होत नसल्याने ग्राहक संतापले आहेत. 

वरिष्ठांचे नियंत्रण राहिले नाहीबकोरिया यांच्या कार्यप्रणालीमुळे अनेक अभियंत्यांचे हितसंबंध दुखावले गेले. अनेक संघटनांनी त्यांच्या बदलीसाठी जोर लावला होता. अखेर मेमध्ये त्यांची बदली झाली. ही बातमी समजताच काही अभियंत्यांनी दौलताबादजवळील एका हॉटेलमध्ये मोठा जल्लोषही केला होता. त्यात मराठवाड्यातील बऱ्याच वरिष्ठ अभियंत्यांनी हजेरी लावली होती. बदली झाल्यानंतर ते तात्काळ कार्यमुक्त झाले. मात्र, त्यानंतर अभियंते व कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांचे नियंत्रण राहिलेले नसल्यामुळे ते कुणालाही जुमानत नसल्याचे सध्याचे चित्र अनुभवास येत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादelectricityवीज