महावितरण अभियंत्यास घेराव
By Admin | Updated: September 1, 2014 01:08 IST2014-09-01T00:55:39+5:302014-09-01T01:08:10+5:30
मसलगा : निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) गावास वीजपुरवठा करणाऱ्या डिपीमध्ये बिघाड झाल्याने गाव तीन दिवसांपासून अंधारात राहिल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शुक्रवारी

महावितरण अभियंत्यास घेराव
मसलगा : निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) गावास वीजपुरवठा करणाऱ्या डिपीमध्ये बिघाड झाल्याने गाव तीन दिवसांपासून अंधारात राहिल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शुक्रवारी महावितरणच्या पानचिंचोली येथील कनिष्ठ अभियंत्यास घेराव घालून विद्युत पुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी केली़
निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) गावास वीजपुरवठा करणाऱ्या डिपीतील ट्रान्सफार्मरमध्ये गेल्या तीन महिन्यापासून बिघाड होत आहे़ त्यामुळे दररोज विजेचा लपंडाव सुरु आहे़ परिणामी नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ या डिपीची दुरुस्ती करण्यात येऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी गावकऱ्यांनी अनेकदा मागणी केली़ मात्र महावितरणकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे़ त्यातच वीजपुरवठा पुर्णपणे खंडित झाला़ त्यामुळे नागरिकांना अंधारात रहावे लागले़
संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी पानचिंचोली येथील महावितरणचे कार्यालय गाठले़ कनिष्ठ अभियंत्यास घेराव घालून विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अशी मागणी केली़ दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने हे प्रकरण निवळले़ यावेळी ज्ञानोबा चामे, तुकाराम पाटील, निलेश तावडे, विष्णु चामे, तुकाराम चामे, उद्धव चामे, लहू पगडे, हरिराम चामे, दत्ता सगर, हरि चौरे, व्यंकट पकडे, सदाशिव मुगळे, गोविंद पगडे, बाळू पांचाळ, नामदेव चौरे, विठ्ठल तगडपल्ले आदी उपस्थित होते़(वार्ताहर)