महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाणांच्या प्रचाराचा झंझावात
By | Updated: November 28, 2020 04:15 IST2020-11-28T04:15:44+5:302020-11-28T04:15:44+5:30
जातीयवादी पक्षाचा विरोध करण्यासाठी सर्व बहुजनांची एकजूट झाली आहे. मराठवाडा पदवीधरांचा प्रश्न मांडण्यासाठी मला विधानपरिषदेचे नेतृत्व करण्यासाठी संधी मतदारांनी ...

महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाणांच्या प्रचाराचा झंझावात
जातीयवादी पक्षाचा विरोध करण्यासाठी सर्व बहुजनांची एकजूट झाली आहे. मराठवाडा पदवीधरांचा प्रश्न मांडण्यासाठी मला विधानपरिषदेचे नेतृत्व करण्यासाठी संधी मतदारांनी द्यावी, असे आवाहन सतीश चव्हाण यांनी केले. यानंतर त्यांनी फातेमा गर्ल्स उर्दू प्राथमिक शाळेतील सहविचार सभेला हजेरी लावली होती. सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्तालय, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, वस्तू व सेवाकर भवन यासह महावितरण येथे आयोजित राष्ट्रवादी ग्रंथालय सेलच्या मेळाव्यास भेट देत प्राध्यापक, शिक्षक, पदवीधरांशी संवाद साधला. शहरातील प्रचार दौऱ्यात यावेळी पी.वाय कुलकर्णी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अभिजित देशमुख, अभय भोसले, अक्षय पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता भांगे, प्रकाश मते, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मयुर सोनवणे आदी उपस्थित होते.
चव्हाण यांच्या प्रचारार्थ मंत्री नवाब मलिक यांच्या विशेष उपस्थितीत शनिवारी पैठण गेटजवळील सब्जीमंडी भागात पदवीधर व कार्यकर्ता मेळावा होणार आहे. औरंगाबाद कॉलेज फॉर वूमन येथे दुपारी तीन वाजता मेळावा होत असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह विविध मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. यासह शनिवारी चव्हाण शहरात विविध ठिकाणी भेटी देऊन पदवीधर मतदारांशी संवाद साधणार आहेत. यात सकाळी साडेदहाला बिल्डर असोसिएशनची बैठक, अकराला विद्यापीठ गेटवरील महाविकास आघाडी युवकांच्या बैठकीस हजेरी, यानंतर शाहू महाराज शिक्षण संस्था, संत गाडगेबाबा मंगल कार्यालयातील महाराष्ट्र राज्य परीट, धोबी संघटनेची बैठक, देवगिरी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी संघटनांची बैठक, गांधी भवनातील शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीस विविध ठिकाणी उमेदवार सतीश चव्हाण भेट देणार आहे.
---- : आपल्या प्रचारादरम्यान बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व मित्र पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण.