महात्मा बसवेश्वर जयंती घरीच साजरी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:04 IST2021-05-07T04:04:56+5:302021-05-07T04:04:56+5:30
औरंगाबाद : जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची १४ मे रोजी जयंती आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही समाजबांधवांनी सकाळी ...

महात्मा बसवेश्वर जयंती घरीच साजरी होणार
औरंगाबाद : जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची १४ मे रोजी जयंती आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही समाजबांधवांनी सकाळी १०.३० वाजता आपल्या घरी महात्मा बसवेश्वर यांचे पूजन करावे, असे आवाहन महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हा समितीने केले आहे.
महाराष्ट्र वीरशैव सभा औरंगाबाद जिल्हा समितीची ४ मे रोजी जिल्हाध्यक्ष शिवलिंगआप्पा गुळवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष मंगलआप्पा मिटकर, जिल्हा सचिव बसवराज कदारे, प्रभाकर कामजळगे, बबन वाळेकर, अमोल बडदाळे, संजीव माळी, देवानंद गुंडगोळे, विजयकुमार भोसगे, शिवानंद नालनकर, अमोल भाले, उमेश लिंभारे, सुदाम गोंधळे, महिला प्रतिनिधी सुंदर सुपारे, स्वाती गुळवे, मंजू भाले आदी उपस्थित होते. श्री संगमेश्वर मठ येथून निघणारी मुख्य मिरवणूक यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. १४ मे रोजी वीरशैव लिंगायत समाजबांधवांनी आपल्या घरातच महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेजे पूजन करावे. त्याचे छायाचित्र मोबाईल, सामाजिक माध्यमांवर टाकावे, असे आवाहन जिल्हा समितीने केले आहे.