संसाराचा गाडा ओढणा-या महिला ऊसतोड कामगार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:08 IST2018-03-08T01:07:56+5:302018-03-08T01:08:01+5:30

पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त राबून महिला ऊसतोड कामगार आपल्या संसाराचा गाडा हाकतात. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी महिला ऊसतोड कामगारांना कसरत करावी लागते.

 Mahasamadha women garment worker! | संसाराचा गाडा ओढणा-या महिला ऊसतोड कामगार!

संसाराचा गाडा ओढणा-या महिला ऊसतोड कामगार!

तारेख शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कायगाव : पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त राबून महिला ऊसतोड कामगार आपल्या संसाराचा गाडा हाकतात. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी महिला ऊसतोड कामगारांना कसरत करावी लागते.
गंगापूर तालुक्यातील गोदावरी काठचा भाग उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. मागील अनेक वर्षांपासून या भागात ऊसतोड कामगारांची वर्दळ असते. वर्षातील कमी-अधिक सहा महिने ऊसतोड कामगार आपल्या बायका-पोरांसमवेत या भागात स्थलांतरित होतात. त्यामुळे ऊसतोड कामगारांचे जिणे या भागातील प्रत्येकाला चांगलेच परिचयाचे आहे. पुरुष ऊसतोड मजूर, महिला ऊसतोड मजूर आणि त्यांच्या साथीला मदत करायला त्यांची लहान चिमुकली. या कामात प्रत्येकाची जबाबदारी वाटलेली असते. पुरुष ऊसतोड मजुरांना शक्यतो शेतातील उसाची तोड करण्याचे काम असते. तर महिला ऊसतोड कामगारांना तोडलेला ऊस उचलून एका ठिकाणी जमा करणे, त्यांच्या मोळ्या बांधणे, उसाचे वाढे जमा करून त्यांच्याही पेंढ्या बांधणे आणि शेवटी पुरुष ऊसतोड कामगारांच्या बरोबरीने बांधलेल्या उसाच्या मोळ्या साखर कारखान्याला नेणाºया वाहनात चढवायच्या. ही सर्व कामे प्रचंड मेहनतीची असतात. हे सर्व उरकून महिला कामगारांना स्वयंपाक, मुलांचे संगोपन आणि आपल्या कुटुंबाची अन्य कामेही करावीच लागतात. अनेकदा महिला कामगारांना लहान बाळांना सोबत आणावे लागते, अशा महिलांची कसरत जास्त असते.

Web Title:  Mahasamadha women garment worker!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.