महाराष्ट्रीयन कबड्डीला आॅलिम्पिकमध्ये हवी संधी
By Admin | Updated: July 15, 2014 00:52 IST2014-07-14T23:46:21+5:302014-07-15T00:52:20+5:30
महेश पाळणे, लातूर राम लक्ष्मण जानकी... जय बोलो हनुमान की़़़ सूरसपाटा मार झपाटा़़़ असे म्हणत दोन संघात खेळला जाणाऱ्या शिवकालीन खेळाला नंतरच्या काळात कबड्डीच्या माध्यमातून मूर्त स्वरूप मिळाले़
महाराष्ट्रीयन कबड्डीला आॅलिम्पिकमध्ये हवी संधी
महेश पाळणे, लातूर
राम लक्ष्मण जानकी... जय बोलो हनुमान की़़़ सूरसपाटा मार झपाटा़़़ असे म्हणत दोन संघात खेळला जाणाऱ्या शिवकालीन खेळाला नंतरच्या काळात कबड्डीच्या माध्यमातून मूर्त स्वरूप मिळाले़ प्रतिस्पर्धी संघातील भिडूला सूर मारून स्पर्श करीत त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत मध्यरेषा गाठताना कबड्डी कबड्डी कबड्डी म्हणण्याचा उच्चार टिकवून ठेवणारा हा दमदार खेऴ
या कबड्डी खेळाचा उगम रांगड्या महाराष्ट्राच्या लालमातीत झाला़ जागतिक पातळीवर हा खेळ आजमीतीला मातीवरून मॅटवर गेला आहे़ प्रतिवर्षी १५ जुलै हा कबड्डी दिन म्हणून साजरा केला जातो़ प्राचीन काळात वेगवेगळ्या नावाने कबड्डी खेळ परिचीत होता़ शब्दाच्या उच्चाराने फुफ्फुस बळकट होत असल्याने मुकी कबड्डी बोलकी झाली़ राज्यातील जनता निरोगी असावी व अंगी चपळता यावी या उद्देशाने शिवाजी महाराजांनी त्याकाळात कबड्डीला सुरूवात केली़ पूर्वी हा खेळ हूतूतू या नावाने ओळखला जात असे़ कबड्डी जरी प्राचीन असली तरी महाराष्ट्रात तिचा जन्म १९२१ साली झाला़ आधुनिक कबड्डीला १९३० साली भारतात सुरूवात झाली़ महाराष्ट्रात सुरूवातीस अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने कबड्डीस चालना दिली़
दयानंद क्रीडा मंडळ, अंधोरी़ स्वामी विवेकानंद विद्यालय, शिरूर ताजबंद़ प्रभात क्रीडा मंडळ, रेणापूऱ जय हिंद क्रीडा मंडळ, रोकडा सावरगाव यासह आनंदवाडी, हिंपळनेर, कवठाळी व चापोलीतील कबड्डीपटूंनी लातूरचे नाव राज्यभर पोेहोचविले. चंद्रकांत पाटील, प्राग़णपतराव माने, धर्मपाल गायकवाड, श्रीरंग बंडापल्ले यांना कबड्डीत शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला आहे़
विनोद लखनगीरे, भास्कर सुर्यवंशी, बाबुराव नलवाड, तुळशिराम रोकडे, अशोक जाधव, सुरेखा जगताप, खतीजा शेख, भाग्यश्री सुर्यवंशी, साजीदा शेख यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली चुणूक दाखवीली आहे़ लातूर जिल्ह्यात शिरूर ताजबंद, अंधोरी, रेणापूर, किनगाव व रोकडा सावरगाव येथे कबड्डीच्या राज्य ते अखिल भारतीय स्तरा पर्यंतच्या स्पर्धा घेण्यात आल्या़
आॅलिम्पिक स्पर्धेत सहभाग व्हावा़़़
मराठमोळ्या कबड्डीचा आॅलिम्पिक स्पर्धेत सहभाग व्हावा, गावोगावी कबड्डी वाढली पाहिजे़ जिल्ह्यासह मराठवाड्यात कबड्डीचा स्तर उंचायला हवा यासह कबड्डीतील तांत्रीक बाबींचा अभ्यास करत खेळाडूंना कौशल्य शिकवीणे गरजेचे असल्याचे मत शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्राग़णपतराव माने यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.