शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

अंकित बावणेच्या सलग दुसऱ्या शतकी खेळीने महाराष्ट्राची विजयी हॅट्ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:15 AM

जबरदस्त फार्मात असणाºया अंकित बावणेच्या सलग दुसºया नेत्रदीपक शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने बंगळुरू येथे रविवारी झालेल्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत पंजाब संघावर ९४ धावांनी मात करताना विजयी हॅट्ट्रिक नोंदवली. फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छाव याने ५ बळी घेत विजयात निर्णायक योगदान दिले.

ठळक मुद्देविजय हजारे करंडक : बलाढ्य पंजाबवर दणदणीत मात, सत्यजित बच्छावचे ५ बळी

औरंगाबाद : जबरदस्त फार्मात असणाºया अंकित बावणेच्या सलग दुसºया नेत्रदीपक शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने बंगळुरू येथे रविवारी झालेल्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत पंजाब संघावर ९४ धावांनी मात करताना विजयी हॅट्ट्रिक नोंदवली. फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छाव याने ५ बळी घेत विजयात निर्णायक योगदान दिले.प्रथम फलंदाजी करणाºया महाराष्ट्राने ५0 षटकांत ५ बाद २८१ धावा उभारल्या. महाराष्ट्राकडून अंकित बावणेने सलग दुसºया शतकाची नोंद करताना १३८ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह नाबाद १00 धावा केल्या. नौशाद शेखने ६0 चेंडूंत ७ चौकार, २ षटकारांसह ६0 व अक्षय पालकरने ३२ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४६ धावांची खेळी केली. कर्णधार राहुल त्रिपाठीने ४८ चेंडूंत ४ चौकारांसह ३८ धावा केल्या. पंजाबकडून मनप्रीतसिंग गोनी व मयंक मार्कं डे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना महाराष्ट्राचे सलामीवीर जय पांडे (0) व ऋतुराज गायकवाड (१६) यांना पाचव्या षटकात धावफलकावर अवघ्या १८ धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर अंकित बावणेने प्रथम राहुल त्रिपाठी याच्याबरोबर तिसºया गड्यासाठी ७७ धावांची भागीदारी करीत डावाला आकार दिला. कर्नाटकविरुद्ध नाबाद १0४ धावांची खेळी करणाºया अंकितने आपली तीच लय कायम ठेवताना नौशाद शेख याच्या साथीने सहाव्या गड्यासाठी ९६ आणि पालकर याला साथीला घेत नाबाद ९0 धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राला भक्कम धावसंख्या उभारण्यात निर्णायक योगदान दिले. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ ४0.३ षटकांत १८७ धावांत कोसळला. पंजाबकडून शुभमान गिल याने सर्वाधिक ५ चौकारांसह ३६ धावा केल्या. मानन व्होराने २७, अभिषेक शर्मा व शरद लुम्बा यांनी प्रत्येकी २३ धावा केल्या. भारताचा शैलीदार फलंदाज युवराज संघ ६ धावांवर बाद झाला. महाराष्ट्राकडून सत्यजित बच्छावने ५४ धावांत ५ व शमशुझमा काझीने १७ धावांत २ गडी बाद केले.संक्षिप्त धावफलकमहाराष्ट्र : ५0 षटकांत ५ बाद २८१. (अंकित बावणे नाबाद १00, नौशाद शेख ६0, अक्षय पालकर ४६, राहुल त्रिपाठी ३८. मनप्रीतसिंग २/४९, मयंक मार्कं डे २/४१).पंजाब : ४.२ षटकांत सर्वबाद १८७. (शुभमान गिल ३६, मानन व्होरा २७, अभिषेक शर्मा २३, शरद लुम्बा २३. सत्यजित बच्छाव ५/५४, शमशुझमा काझी २/१७, अनुपम संकलेचा १/३१).

टॅग्स :BCCIबीसीसीआय