शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

महाराष्ट्राचा स्टार फलंदाज अंकित बावणे यंदा घरच्या मैदानावर ‘एपीएल’मध्ये खेळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 15:15 IST

बीसीसीआयच्या रणजी करंडक आणि विजय हजारे करंडकात अंकित बावणे याने शानदार फलंदाजी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र रणजी संघाचे कर्णधारपद भूषवणारा छत्रपती संभाजीनगरचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे यंदा अनेक वर्षांनंतर घरच्या मैदानावर लोकमत एपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. तो यंदा ग्रीन गोल्ड सान्या युनायटेड संघाचे प्रतिनिधित्व ओपनचा खेळाडू म्हणून करणार आहे. ए. ए. प्रस्तुत लोकमत एपीएलला १ फेब्रुवारीपासून गरवारे स्टेडियमवर प्रारंभ होत आहे. गतवर्षीप्रमाणेच अपूर्व वानखेडे, धर्मेश पटेल, दीपक खत्री यंदाही एपीएलचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

बीसीसीआयच्या रणजी करंडक आणि विजय हजारे करंडकात अंकित बावणे याने शानदार फलंदाजी केली आहे. तसेच महाराष्ट्रातर्फे सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या सुरेंद्र भावे यांचा प्रथमश्रेणीतील सर्वाधिक धावांचा विक्रमही मागे टाकला. याच हंगामात अंकितने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत देशात सर्वाधिक शतके व धावांचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळत असल्यामुळे अंकित बावणे हा नक्कीच चांगली कामगिरी करण्यास आतूर असणार आहे. ग्रीन गोल्ड सान्या युनायटेडने गत हंमागात प्रभावी कामगिरी करणाऱ्या विनायक भोईरला यंदाही त्यांच्या संघात ओपनचा खेळाडू म्हणून घेतले आहे. बीडचा ऋषिकेश सोनवणेदेखील याच संघाकडून खेळणार आहे. विद्यमान चॅम्पियन संघ राव रॉयल्सने दीपक खत्रीला पुन्हा ओपन खेळाडू म्हणून संघात कायम ठेवले आहे. नंदिनी स्टार्सने अभिषेक पाठक व त्रिपुरेश सिंगला संघात घेतले आहे. शिंदे रायझिंग किंग्जने ओम भोसले याला ओपन खेळाडू म्हणून पसंती दिली आहे. भवानी टायगर्सने त्यांचे ओपन खेळाडू अद्याप जाहीर केलेले नाहीत.

नयन गुड्डू ईएमआय २१ कडून तर सुयश प्रभुदेसाई पटेल वॉरियर्सकडून खेळणारपटेल वॉरियर्सने यंदा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुयश प्रभुदेसाईला ओपन खेळाडू म्हणून संघात स्थान दिले आहे.

सीएल कासा स्ट्रायकर्सने यंदा संदीप दहाडला संधी दिली आहे. तसेच गत एपीएलचे दोन पर्व गाजवणारा नयन चव्हाण यंदा गुड्डू ईएमआय संघाकडून खेळताना दिसणार आहे. धर्मेश पटेललाही संघाने कायम ठेवले आहे. मनजित प्राइडने गगनभेदी षटकार खेचण्यात वाकबगार असणारा अपूर्व वानखेडेला ओपन खेळाडू म्हणून संघात पसंती दिली आहे.

एपीएलमधील ओपन खेळाडूंची यादीग्रीन गोल्ड सान्या युनायटेड : विनायक भोईर, ऋषिकेश सोनवणे, अंकित बावणे, यश चव्हाण. सीएल कासा स्ट्रायकर्स : मोहित जांगरा, सागर मिश्रा, संदीप दहाड. राव रॉयल्स : भारत शर्मा, दीपक खत्री, मोहित खत्री. गुड्डू ईएमआय २१ : यासर शेख, धर्मेश पटेल, प्रवीण देशेट्टी, नयन चव्हाण. नंदिनी स्टार्स : अभिषेक पाठक, त्रिपुरेश सिंग, मनजित प्राइड वर्ल्ड : अपूर्व वानखेडे, साईराज पाटील, पटेल वॉरियर्स : सुयश प्रभुदेसाई, मुर्तजा ट्रंकवाला, एस. चढ्ढा. लाइफ लाइन मॅव्हरिक्स : अमन खान, भाऊ पुनिया, सागर उद्देशी, सत्यम भोईर, शिंदे रायझिंग किंग्ज : ओम भोसले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरLokmatलोकमत