शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘आत्मा’चा महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 23:22 IST

औरंगाबाद : कृषी विभागातील अ‍ॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट सिस्टीम अर्थात ‘आत्मा’अंतर्गत राबविण्यात येणारा महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प (एमएसीपी) बंद करण्यात आला आहे.

औरंगाबाद : कृषी विभागातील अ‍ॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट सिस्टीम अर्थात ‘आत्मा’अंतर्गत राबविण्यात येणारा महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प (एमएसीपी) बंद करण्यात आला आहे.

शेतकरी उत्पादक कंपनीची चळवळ उभी करण्यास एमएसीपीचा मोठा वाटा आहे. यासाठी जागतिक बँकेने अर्थसाह्य केले होते. २०१० च्या डिसेंबर महिन्यात या प्रकल्पाला सुरुवात झाली. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील कृषी विभागात ‘आत्मा’अंतर्गत एमएसीपी प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पाची मुदत डिसेंबर २०१६ होती; पण त्यानंतर आणखी दोन वर्षांची मुदत वाढून ३० नोव्हेंबर २०१८ रोजी प्रकल्प बंद करण्यात आला.

राज्यात ४०६ शेतकरी कंपन्या तयार करण्यात आल्या. त्यांना यंत्रसामुग्री खरेदीसाठी सुमारे ७२ कोटी रुपये खर्चापैकी ५३ कोटी रुपये जागतिक बँकेकडून देण्यात आले व उर्वरित रक्कम शेतकरी कंपन्यांनी उभारली. याद्वारे राज्यात दीड लाख शेतकरी एकत्र आले. औरंगाबादचा विचार केल्यास मागील सात वर्षांत जिल्ह्यात १४ अनुदानित व १ विनाअनुदानित, अशा १५ शेतकरी कंपन्यांची स्थापना करण्यात आली.

यंत्रसामुग्रीसाठी सर्व कंपन्यांना मिळून १ कोटी ७० लाख रुपयांच्या जवळपास रक्कम देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता एमएसीपीचा पुढचा टप्पा म्हणून राज्य शासन जागतिक बँकेच्या सहकार्याने ‘स्मार्ट प्रकल्प’ सुरू करणार आहे. याद्वारे शेतकरी कंपन्यांना व्यवसायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. मात्र, हा प्रकल्प कधी सुरू होणार हे राज्य शासनाने अजून स्पष्ट केले नाही.

एमएसीपीचे कर्मचारी घरी‘आत्मा’अंतर्गत महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प (एमएसीपी) प्रकल्प राबविण्यात येत होता. मात्र, जागतिक बँकेच्या करारानुसार ३० नोव्हेंबर २०१८ रोजी या प्रकल्पाचा कालावधी संपला. यामुळे या प्रकल्पात काम करणाºया कर्मचाºयांची सेवाही संपुष्टात आली. शहानूरमियाँ दर्गा परिसरातील ‘आत्मा’च्या कार्यालयात एमएसीपीसाठी तीन कर्मचारी कार्यरत होते. यात एक कृषी पणनतज्ज्ञ, एक संगणक परिचालक व एक लेखापाल यांचा समावेश होता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागात एमएसीपीचा विभाग होता. यात तीन कर्मचारी होते, तसेच याचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. प्रकल्पाचा कालावधी संपल्याने या प्रकल्पात काम करणाºया सर्व कर्मचाºयांची सेवा संपुष्टात आली. मागील ७ वर्षांचा अनुभव लक्षात घेता ‘स्मार्ट’ प्रकल्पात सामावून घ्यावे, अशी मागणी कर्मचाºयांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीAurangabadऔरंगाबाद