राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:46 IST2017-12-16T23:46:05+5:302017-12-16T23:46:51+5:30

गोवा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ फुटसाल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.

Maharashtra won the title of the National Football Championship | राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपद

राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपद

औरंगाबाद : गोवा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ फुटसाल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. गोवा संघाने महाराष्ट्राला अंतिम फेरीत ३-२ गोलने पराभूत केले. या स्पर्धेत महाराष्ट्राकडून कर्णधार सिद्दीकी आकिब, आकाश चौधरी, विशाल मगरे यांनी लक्षवेधी कामगिरी केली. विशेष म्हणजे विशाल मगरे याने तेलंगणा व गुजरात संघाविरुद्ध गोलची हॅट्ट्रिक नोंदवली. गोलरक्षक आकाश चौधरी याने सर्वोत्तम गोलकिपरचा पुरस्कार जिंकला. मुलींमध्ये ऋतुजा गुणवंत, प्रियंका मुरादे, जया कुमार यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
उपविजेतेपद पटकावणारा महाराष्ट्राचा संघ : प्रतीक स्वामी (औरंगाबाद), आकाश चौधरी (रायगड), विशाल मगरे (औरंगाबाद), सिद्दीकी आकिब (कर्णधार, औरंगाबाद), समरीन रॉय (पुणे), नँथून स्टीवन्स (पुणे), लियॉन नेसमानी (पुणे), हर्षद चव्हाण (रत्नागिरी), मनीष पंजाबी (रायगड), दमनप्रीत सिंग (रायगड), मोहन नेवारे (भंडारा), सियॉन डिसुझा (मुंबई). या संघाला प्रशिक्षक रणजित भारद्वाज आणि व्यवस्थापक मोहंमद रियाज यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Maharashtra won the title of the National Football Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.