शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य लॉटरीने छत्रपती संभाजीनगरचे ५ जण करोडपती; आता लॉटरीच्या कुंडलीतच ‘शनी’

By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 25, 2025 19:50 IST

महाराष्ट्र राज्य लॉटरीची सुरुवात १२ एप्रिल १९६९ ला झाली. तेव्हापासून आजपर्यंत मागील ५५ वर्षांत जिल्ह्यात या लॉटरीमुळे ५ भाग्यवंतांना प्रत्येकी एक कोटीची लॉटरी लागली.

छत्रपती संभाजीनगर : मागील ५५ वर्षांत जिल्ह्यातील ५ जणांना करोडपती बनविणाऱ्या महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या कुंडलीत आता ‘शनी’ आला आहे. नशिबाचा हा खेळ आता बंद होण्याच्या मार्गावर आहे.

मागील १० वर्षांत २ जण करोडपतीमहाराष्ट्र राज्य लॉटरीची सुरुवात १२ एप्रिल १९६९ ला झाली. तेव्हापासून आजपर्यंत मागील ५५ वर्षांत जिल्ह्यात या लॉटरीमुळे ५ भाग्यवंतांना प्रत्येकी एक कोटीची लॉटरी लागली. मागील १० वर्षांत त्यातील २ जण करोडपती ठरले. २०१७ व २०२३ या वर्षी जिल्ह्यातील दोन भाग्यवान विजेत्यांना एक कोटीची दसरा-दिवाळी बंपर लॉटरी लागली.

एप्रिलनंतर प्रिंटिंगच्या ऑडर बंदअनेकांना करोडपती बनविणाऱ्या महाराष्ट्र राज्य लॉटरीला आता घरघर लागली आहे. दोन महिने आधीच तिकिटांची प्रिंटिंग होत असते. यंदा एप्रिलपासूनच्या ऑडर सरकारकडून मिळाल्या नाहीत. यामुळे लॉटरी बंद होणार, असे संकेत मानले जात आहेत.

२८ टक्के जीएसटी, लवचिक धोरणाचा अभाव१) २००३ पर्यंतचा काळ महाराष्ट्र राज्य लॉटरी व्यवसायाचे सुवर्णयुग होते.२) २००४ नंतर ऑनलाइन लॉटरीचे युग आले.३) परराज्यातील ऑनलाइन लॉटरीने बाजारपेठेवर कब्जा केला.४) २०१७ पासून लॉटरीवर २८ टक्के जीएसटी लागला.५) परराज्यातील ऑनलाइन लॉटरीच्या जागी पुन्हा तिकीट अवतरले.६) एक-दोन आकडी लॉटरी बंदे होऊन चार अंक जुळले तरच लॉटरी लागायची.६) न विकलेले लॉटरी तिकीट अन्य राज्य विक्रेत्यांकडून वापस घेतात.७) पण न विक्री झालेले महाराष्ट्र राज्य लॉटरीचे तिकीट विक्रेत्यांकडून वापस घेत नाही.७) वाढीव जीएसटी व धोरणात लवचिकपणा नसल्याने महाराष्ट्र राज्य लॉटरीचा खेळ बिघडला.८) व्यवसाय कमी झाल्याचे कारण दाखवित महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या

जिल्ह्यात दसरा-दिवाळीदरम्यान दररोज ३० लाखांची उलाढालजिल्ह्यात महाराष्ट्र राज्य लॉटरीची दररोज ५ ते १० लाखांची उलाढाल होते. महाराष्ट्र दिन १ मे, तसेच गणेशोत्सव, दसरा-दिवाळी, नाताळ बंपर लॉटरी दरम्यान दररोज २५ ते ३० लाखांची उलाढाल होत असते. तसे परराज्यातील लॉटरी मिळून जिल्ह्यात दररोज ५० लाखांची उलाढाल होत असते.

१०० लॉटरी विक्रेत्यांच्या ‘नशिबा’चा प्रश्नआजघडीला महाराष्ट्र राज्य लॉटरी सोबत नागालँड, सिक्किम, पंजाब, गोवा या राज्यांच्या लॉटरी चालू आहेत. जिल्ह्यात एकूण ५००च्या जवळपास लॉटरी विक्रेते आहेत, तर २ होलसेलर आहेत. यातील १०० लॉटरी विक्रेते अन्य राज्यांतील लॉटरी सोबत महाराष्ट्र राज्य लॉटरी विकतात. ही महाराष्ट्र लॉटरी बंद पडली, तर त्यांचा व्यवसाय ३० ते ४० टक्क्याने कमी होईल. राज्यातील २० हजार लॉटरी विक्रेत्यांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महाराष्ट्र सरकारला का परवडत नाही?परराज्यात लॉटरी व्यवसाय करोडो रुपयांचा महसूल देत असताना महाराष्ट्रात लॉटरी व्यवसाय बंद पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे. राज्य लॉटरीची योग्य प्रकारे जाहिरात केली तर यातून सरकारचा महसूल वाढेल आणि व्यवसाय बंद करण्याची सरकारवर वेळ येणार नाही.- विलास खंडेलवाल अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर जिल्हा लॉटरी विक्रेता संघटना

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMONEYपैसा