शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Maharashtra HSC result 2018 : औरंगाबाद विभागात मुलींची बाजी; सरासरी निकाल ८८.७४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 17:20 IST

औरंगाबाद विभागाचा सरासरी निकाल ८८.७४ टक्के एवढा लागला. यात ९२.१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.७४ आहे

ठळक मुद्देऔरंगाबाद विभागात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश पाचही जिल्ह्यात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५. २७ टक्क्यांनी अधिक असल्याचे निकालातुन स्पष्ट झाले.

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षाचा (१२ वी) निकाल बुधवारी (दि.३०) दुपारी १ वाजता जाहीर झाला. औरंगाबाद विभागाचा सरासरी निकाल ८८.७४ टक्के एवढा लागला. यात ९२.१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.७४ असल्याची माहिती विभागीय मंडळाच्या अध्यक्षा सुगता पुन्ने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद विभागात सामाविष्ठ  असलेल्या औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा बुधवारी दुपारी निकाल जाहीर झाला. या निकालात परभणी जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. परभणी जिल्ह्याचा सरासरी निकाल ८९.९० टक्के एवढा लागला. तर औरंगाबादचा ८९.१४ टक्के, बीडचा ८९.०८ टक्के, जालना ८७.४५ आणि हिंगोली जिल्ह्याचा निकाल ८६.४० टक्के एवढा लागला आहे. या पाचही जिल्ह्यात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५. २७ टक्क्यांनी अधिक असल्याचे निकालातुन स्पष्ट झाले.

गुणपत्रिकांचे वाटप १२ जून रोजी कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेखाचे वाटप विभागीय मंडळामार्फत मंगळवारी (दि.१२ जून) होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका संबंधित महाविद्यालायात याच दिवशी दुपारी ३ वाजता होणार असल्याचे सुगता पुन्ने यांनी स्पष्ट केले. तर नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणे सप्टेंबर-आॅक्टोबर ऐवजी जुलै महिन्यातच घेण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आकडेवारी- औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यात ११८१ कनिष्ठ महाविद्यालयातील ३७४ केंद्रावर परीक्षा झाली.- परीक्षेसाठी ६१ परिरक्षक, ३७४ केंद्र संचालक, ६६०० पर्यवेक्षक, ३० मुख्य नियामक, ८९७ नियामक, ५९९१ परीरक्षक कार्यरत होते.- परीक्षेसाठी एकुण १४३ विषय.

-परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या ३०१ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले 

जिल्हानिहाय आकडेवारीजिल्हा            नोंदणी        हजेरी        उत्तीर्ण        टक्केवारीपरभणी         २२,६६४        २२,५८७        २०३०६         ८९.९०औरंगाबाद     ५९,७०१        ५९,६०९        ५३,१४१        ८९.१५बीड               ३७,६६२        ३७,५५६        ३३,४५५        ८९.०८जालना         २७,२३४        २७,१८२        २३,७७२         ८७.४५हिंगोली         १२,१९१        १२,१५२        १०,४९९        ८६.४०-------------------------------------------------------------------एकुण        १,५९,४५२     १,५९,०८६    १,४१,१७३        ८८.७४ 

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८examपरीक्षाMarathwadaमराठवाडाStudentविद्यार्थी