शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीनंतर महाराष्ट्रातील दोन लाख कंपन्या बंद पडल्या - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 18:04 IST

नोकऱ्या देण्याऐवजी नोकऱ्या गमवाव्या लागण्याचा जोरदार कार्यक्रम

औरंगाबाद : नोटाबंदीनंतर देशभरात ६ लाख कंपन्या बंद पडल्या आणि महाराष्ट्रात ही संख्या जवळपास दोन लाख कंपन्यांपेक्षाही अधिक आहे. म्हणजे  मोदींच्या काळात नोकऱ्या देण्याऐवजी नोकऱ्या गमावण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लक्ष वेधले.

औरंगाबाद मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना यांच्या प्रचारार्थ हर्सूल येथे आयोजित सभेत ते काल रात्री बोलत होते. त्यांनी सांगितले की, मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही मंदी आली होती; पण मनमोहनसिंगांचे नेतृत्व इतके चांगले होते की, त्यावेळी युवकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या नाहीत. आज नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात मात्र नोकऱ्या देण्याऐवजी नोकऱ्या गमवाव्या लागण्याचा जोरदार कार्यक्रम सुरू आहे. 

औरंगाबादच्या स्कोडा कंपनीत जाऊन पाहा. जिथे शंभर गाड्या बनवल्या जात होत्या, तिथे आता २०-३० गाड्या बनवल्या जात असतील. हाच अनुभव बजाज आॅटोमध्येही येईल. किंबहुना देशातल्या कुठल्याही कंपनीत असाच अनुभव येईल. ही परिस्थिती भयावह असल्याची जाणीव जयंत पाटील यांनी करून दिली. २००९ च्या निवडणुकीत कदीर मौलाना हे अवघ्या काही मतांनी पराभूत झाले होते. त्यावेळी ते निवडून आले असते तर आजही मौलाना हेच आमदार राहिले असते, असे सांगत पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले. अमोल मिटकरी, कदीर मौलाना, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय साळवे, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, माजी उपमहापौर तकी हसन, लक्ष्मण औताडे, नसीर पटेल, राजू औताडे, शमीम पटेल, गफारभाई आदींची मंचावर उपस्थिती होती. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलAurangabadऔरंगाबाद