शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

Maharashtra Election 2019 : भाजप-सेनेतील दोन दानवेंनी मिळून बंडखोरांना केले थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 18:53 IST

बंडखोरी थंड करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून प्रयत्न केले.

ठळक मुद्देऔरंगाबाद पश्चिममध्ये राजू शिंदे  वगळता उर्वरित ठिकाणी यश

औरंगाबाद : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली बंडखोरी थंड करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून प्रयत्न केले. त्यात औरंगाबाद पश्चिममध्ये राजू शिंदे  वगळता उर्वरित ठिकाणी यश मिळाल्याची माहिती आ. दानवे यांनी दिली.

औरंगाबाद पूर्वमधून बंडखोरी केलेले राजू वैद्य यांना बोलावून घेत अर्ज मागे घेण्याचा निरोप देण्यात आला. त्यांना विश्वनाथ नेरूरकर यांनी मुंबईतून फोन केला. फुलंब्रीतील शिवसेना बंडखोर रमेश पवार यांना आ. दानवे यांनी शांत केले. औरंगाबाद मध्यमधून किशनचंद तनवाणी यांना माघार घेण्यास रावसाहेब दानवे यांनी भाग पाडले. तनवाणी यांनी माघार घेतल्यामुळे पश्चिममधून बाळासाहेब गायकवाड यांनीही माघार घेतली. वैजापूरमधील भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव आणि दिनेश परदेशी यांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश रावसाहेब दानवे यांनी  दिले. 

असे राहणार जिल्ह्याचे चित्र

औरंगाबाद पूर्व : ३४ उमेदवार रिंगणातऔरंगाबाद पूर्वमध्ये ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपाचे अतुल सावे, एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी आणि समाजवादी पार्टीचे कलीम कुरेशी यांच्यात लढत होणार आहे. २०१४ मध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस  अशी पंचरंगी लढत झाली होती. या लढतीत राज्यमंत्री अतुल सावे यांचा निसटता विजय झाला होता. तर डॉ. गफ्फार कादरी यांना पराभवाला समोरे जावे लागले होते. 

औरंगाबाद पश्चिम : १२ उमेदवार रिंगणातऔरंगाबाद पश्चिम मतदार संघात शिवसेनेचे संजय शिरसाठ, एमआयएमचे अरुण बोर्डे, वंचित बहुजन आघाडीचे संदीप शिरसाठ तसेच अपक्ष म्हणून भाजपाचे राजू शिंदे यांच्यासह १२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत भाजपाचे बंडखोर राजू शिंदे आणि सेनेचे संजय शिरसाठ यांच्या लढत होण्याची चिन्हे आहेत. 

औरंगाबाद मध्य : १४ उमेदवार रिंगणातऔरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात १४ उमेदवार नशीब अजमावत आहेत. मतदारसंघात शिवसेना विरूद्ध एमआयएम अशी थेट लढत होण्याची चिन्हे आहेत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीमुळे ही  निवडणूक सध्या तरी चौरंगी दिसते आहे. २०१४ मध्ये या मतदार संघातून एमआयएमचे इम्तियाज जलील हे विजयी झाले होते. तर शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल पराभूत झाले होते.

सिल्लोड : ७ उमेदवार रिंगणात उमेदवारी मागे घेत भाजपचे बंडखोर उमेदवार प्रभाकर पालोदकर यांच्यामागे उभे राहिले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांना ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर व शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांच्यात थेट लढत होईल, असेच चित्र सध्या आहे.

वैजापूर : १६ उमेदवार रिंगणात वैजापूर विधानसभा मतदारसंघात १६ उमेदवार रिंगणात असून, सध्या तरी शिवसेनेचे रमेश बोरनारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय पाटील चिकटगावकर यांच्यातच थेट लढत होईल, असे चित्र आहे. भाजपचे बंडखोर डॉ. दिनेश परदेशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे बोरनारे यांची कोंडी झाली होती; परंतु सोमवारी दोघांनीही उमेदवारी मागे घेतल्याने पेच संपुष्टात आला. 

कन्नड : ८ उमेदवार रिंगणातकन्नड विधानसभा मतदारसंघात ८ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई  हर्षवर्धन जाधव व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार हे आमने-सामने असून, दोघेही अपक्ष आहेत. भाजपचे जि. प. सदस्य किशोर पवार यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर हर्षवर्धन जाधव यांचीही डोकेदुखी वाढली आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे.

फुलंब्री : १३ उमेदवार रिंगणात फुलंब्री विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे हरिभाऊ बागडे व  काँग्रेसचे डॉ.  कल्याण काळे या दोघांमध्ये थेट लढत झाली होती. यावेळीही बागडे व डॉ. काळे यांच्यातच थेट लढत होण्याची शक्यता आहे. 

पैठण : १५ उमेदवार रिंगणातपैठण विधानसभा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याही वेळी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत होणार  असल्याचे चित्र दिसत असले तरी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांपुढे वंचित बहुजन आघाडीचे मोठे आव्हान राहणार आहे. 

गंगापूर : १४ उमेदवार रिंगणात गंगापूर विधानसभा मतदारसंघात १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याठिकाणी भाजपचे प्रशांत बन्सीलाल बंब व राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष अण्णासाहेब माने यांच्यातच थेट लढत होईल, अशी स्थिती दिसत आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv Senaशिवसेनाraosaheb danveरावसाहेब दानवेAmbadas Danweyअंबादास दानवे