शहरं
Join us  
Trending Stories
1
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
2
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
4
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
5
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
6
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
7
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
8
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
9
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
10
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
11
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
12
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
13
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
14
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
15
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
16
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
17
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
18
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
19
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
20
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

जिद्दी ! १० वर्षांच्या संघर्षानंतर आले मतदार यादीत नाव; मात्र ओळख पटवताना आले नाकीनऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 13:09 IST

२८ वर्षाऐवजी ५५ वर्ष वय आल्याने ओळख पटविण्यात अडचण 

ठळक मुद्दे   प्रशासनाने छळले : तरीही मतदान केल्याशिवाय माघार नाहीच

औरंगाबाद : एका नवमतदाराला त्याचे नाव मतदार यादीत दाखल करण्यासाठी तब्बल दहा वर्षे संघर्ष करावा लागला. महत्प्रयासाने मतदार यादीत नाव आले. मात्र, मतदानासाठी ओळख पटविताना ‘त्या’ मतदाराच्या अक्षरश: नाकीनऊ आल्याची आपबिती त्याने सांगितली.     

छावणीतील होलीक्रॉस इंग्रजी शाळेतील मतदान केंद्रावर नवीन मतदार संजय साहेबराव उमाप (२८) यांनी सांगितले की, त्यांचे वय १८ वर्षे झाल्यापासून गेली दहा वर्षे त्यांनी लोकसभा, विधानसभा आणि छावणी परिषदेच्या निवडणुकांच्या वेळी मतदार यादीत त्यांचे नाव दाखल करण्यासाठी नोंदणी केली. मात्र, त्यांचे नाव मतदार यादीत आले नाही. सध्याच्या विधानसभेच्या मतदार यादीत त्यांचे नाव यादी भाग १२२ मध्ये अनुक्रमांक १२४३ वर आहे. यावेळी तरी नक्की मतदान करता येईल, म्हणून त्यांना आनंद झाला.  मात्र, सोमवरी (दि.२१) प्रत्यक्ष मतदानासाठी गेल्यानंतर त्यांना वेगळाच अनुभव आला. मतदार यादीत त्यांचे वय ५५ वर्षे दर्शविले आहे. त्यामुळे मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. मतदार यादीत ५५ वर्षे वय दाखविल्याची महसूल कर्मचाऱ्यांची चूक असल्याचे संजयने सांगितले. वस्तुत: त्यांचे वय २८ वर्षे आहे. 

संजय साहेबराव उमाप हे ‘तेच’ असल्याचे पटवून देण्यासाठी त्यांनी मतदान केंद्रावरील पोलिंग एजंटची ओळख दिली. तोच संजय असल्याचेही एजंट आणि मतदानासाठी आलेल्या संजयच्या शेजाऱ्यांनी सांगितले. मात्र, शासनाने ठरवून दिलेल्या ओळखपत्रापैकी एक असल्याशिवाय मतदान करता येणार नाही, असे त्याला सांगण्यात आले. परिणामी, संजयला पुन्हा पायी ख्रिस्तनगर येथे त्याच्या घरी जाऊन ‘पॅन कार्ड’ आणून ओळख पटवून द्यावी लागली. ओळख पटविताना मात्र, त्याच्या नाकीनऊ आले. यापेक्षा मतदान न करता घरी जाण्याचा विचारही त्याच्या मनात आला; परंतु तसे न करता पुन्हा निर्धार करून तो मतदान केंद्रावर गेला. हे दिव्य पार पडल्यानंतर प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी बोटाला शाई लावून पहिल्यांदाच मतदान केल्यानंतर ‘आता मी खऱ्या अर्थाने भारताचा नागरिक असल्याचा आलेला अनुभव’ अविस्मरणीय असल्याचे संजयने सांगितले. 

काही असे काही तसे...सुशिक्षित वर्गात दिवसेंदिवस मतदानाबाबत उदासीनता वाढत आहे. त्याची विविध कारणे आहेत. मतदार यादीत नाव नसणे, मतदान केंद्र बदलणे, दूरच्या मतदान केंद्रावर नाव असणे, यामुळे सुशिक्षित मतदार मतदानाकडे पाठ फिरवीत असल्याचे दिसते, तर ज्यांना मतदानाची उत्सुकता आहे, त्यांना रोखले जाते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यVotingमतदान