शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

Maharashtra Election 2019 : संजय शिरसाटांना खरे आव्हान राजू शिंदे यांचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 19:29 IST

१२ उमेदवार रिंगणात 

ठळक मुद्देचौरंगी लढतीची उत्सुकता

- राम शिनगारे

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट झाले. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे पहिल्यांदाच या मतदारसंघात काँग्रेसविना लढत होत आहे. अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले राजू शिंदे, एमआयएमचे अरुण बोर्डे आणि विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे. यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संदीप शिरसाट कशा पद्धतीची लढत देतात, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. 

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे दहा वर्षांपासून संजय शिरसाट हे प्रतिनिधित्व करीत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना या मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते. मात्र, त्याचवेळी एमआयएमच्या उमेदवारानेही लक्षणीय मते घेतली होती. त्यामुळे लोकसभेतील मताधिक्य राखण्याचे आव्हान संजय शिरसाट यांच्यासमोर असणार आहे. मात्र, याचवेळी भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. याचवेळी लोकसभेत एकत्र असणारी एमआयएम आणि व्हीबीए  आघाडी यावेळी स्वतंत्र लढत आहे. त्यामुळे एमआयएमच्या उमेदवाराचे मताधिक्य हे व्हीबीएच्या उमेदवारावर अवलंबून असणार आहे. यातच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा कोणाला पाठिंबा मिळतो यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे. मतदारसंघातील मूलभूत सुविधांच्या अभावाचा सामना युतीच्या उमेदवाराला करावा लागणार आहे. चौरंगी लढतीमध्ये कोण कोणाची मते स्वत:च्या पारड्यात घेणार यावर सर्व काही अवलंबून असणार आहे. 

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न- पश्चिम मतदारसंघ विखुरलेला आहे. पडेगाव, मिटमिटा हा भाग २० वर्षांपासून महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येतो. मात्र त्याठिकाणी अद्यापही मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. वर्षभरापूर्वी समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाईकडेही सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे दुर्लक्ष आहे.- वाळूज महानगरची लोकसंख्या बघता दहा वर्षांपूर्वीच नगर परिषदेची निर्मिती करणे गरजेचे होते. विकासाचा केंद्रबिंदू हा अजूनही ग्रामपंचायतच आहे. यात बदल करण्याची गरज असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.- औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पडेगाव, मिटमिटा, जुना भावसिंगपुरा, सातारा, देवळाईसह इतर भागांत भीषण पाणीटंचाई जाणवते. सातारा-देवळाई परिसरात अद्यापही पिण्याच्या पाण्याची लाईन टाकलेली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना बारमाही टँकरवरच अवलंबून राहावे लागते.

उमेदवारांच्या जमेच्या बाजू :संजय शिरसाट (शिवसेना)- नगरसेवक, सभागृहनेता, स्थायी समिती सभापती, अशा विविध पदांवर मनपात काम केले.- मुलगा नगरसेवक असून, दहा वर्षांपासून स्वत: आमदार म्हणून कार्यरत. - उद्धव ठाकरे यांचे विश्वासू.- वाळूज, बजाजनगर, रांजणगावात चांगली पकड.

राजू शिंदे (अपक्ष)- तीन वेळा नगरसेवक, दोन वेळा स्थायी समिती सभापती, एक वेळा उपमहापौर.- विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते.- सर्वच राजकीय पक्षांशी चांगले हितसंबंध असून, राजकीय आव्हाने स्वीकारण्याची जुनी सवय.

अरुण बोर्डे (एमआयएम)- माजी मंत्री गंगाधर गाडे यांच्या तालमीत जडणघडण. आक्रमक कार्यकर्ता म्हणून ओळख.- दहा वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर. पत्नी नगरसेविका व विरोधी पक्षनेत्या.- खा. इम्तियाज जलील यांचे खास विश्वासू.

संदीप शिरसाठ (व्हीबीए)- विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग. विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून जाण्याची सवय. - स्वबळावर आजपर्यंतची  आश्वासक वाटचाल. बेधडकपणे काम करण्याची सवय.- युवकांचे चांगले संघटन. विविध पक्षांतील युवकांशी मैत्रीचे संबंध.

2०14चे चित्रसजय शिरसाट ( शिवसेना-विजयी)  मधुकर सावंत (भाजप-पराभूत)

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमShiv SenaशिवसेनाBJPभाजपा