शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

काँग्रेसने निवडणूकीपूर्वीच मैदान सोडले : शहनवाज हुसैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 10:30 PM

हरियाणा, महाराष्ट्रातील सर्वच भागामध्ये भाजपचा बोलबाला असल्याचे सांगितले.

औरंगाबाद : काँग्रेस पक्षाचा लोकसभेत झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूकीच्या पूर्वीच पराभव मान्य करत मैदान सोडल्याची टिका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसैन यांनी केली.

मराठवाड्याच्या दौ-यावर असलेल्या शहनवाज हुसैन यांनी 'लोकमत' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी हरियाणा, महाराष्ट्रातील सर्वच भागामध्ये भाजपचा बोलबाला असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी लढाई करण्याच्या स्थितीत होते. मात्र आता काँग्रेस लढाईतच राहिली नाही.पाच वषार्पूर्वीपर्यंत काँग्रेस राज्यात सत्तेत होती. तीन मुख्यमंत्री कार्यरत आहेत. तरी लढण्यास कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे काँग्रेसने लढाईपूर्वीच मैदान सोडले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

भाजप व शिवसेनेची मागील विधानसभा निवडणूकीत युती नव्हती. तरीही भाजपच्या मुख्यमंत्र्याने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. यावेळी युती असल्यामुळे परिस्थिती अधिक भक्कम बनली आहे. एका जागेसाठी दहा-दहा उमेदवार स्पर्धेत होते. उमेदवारी मिळाली नसल्यामुळे अनेकांना नाराज व्हावे लागले. काही मतदारसंघ युतीमध्ये शिवसेना सोडण्यात आल्यामुळे नाराजीची स्थिती होती. मात्र इच्छुकांची नाराजी दुर करण्याचे काम केले आहे. त्यामुळे पुन्हा सत्ता स्थापन करण्यास कोणत्याही अडचणी उद्भवनार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. औरंगाबादसह मराठवाड्याला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम भाजपाने केले आहे. मराठवाड्यातील अनेक भाग काँग्रेसमुक्त बनले आहेत. औरंगाबाद शहरही काँग्रेसमुक्त असल्याचे शहनवाज हुसैन यांनी सांगितले.पंतप्रधान महात्मा गांधींच्या विचारांवर चालतात

काँग्रेस पक्षाने महात्मा गांधी यांचे नाव घेतले. मात्र त्यांचे विचार सोडून दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांच्या विचारानुसार चालत आहेत. गांधीजींनी सांगितलेली प्रत्येक विकासाचा विचार त्यांनी आत्मसात करुन त्यांची अंमलबजावणी सुरू केल्याचेही शहनवाज हुसैन यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019