शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बसणार १५ हजार कोटींचा फटका; निवडणुकीच्या प्रचारातून मूळ मुद्दाच गायब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 18:28 IST

निवडणुकीच्या धामधुमीत शेती आणि शेतकऱ्यांच्या मूळ मुद्याकडे दुर्लक्ष

ठळक मुद्दे यावर्षी कापसाचे, रुईचे दर अमेरिका व जगाच्या बाजारात घटले आहेत

औरंगाबाद : आर्थिक मंदीच्या संकटामुळे कापड उद्योगाकडून कापसाची मागणी घटत आहे. परिणामी राज्यासह मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १० ते १५ हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या धामधुमीत शेती आणि शेतकऱ्यांच्या मूळ मुद्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे. 

देशातील कापसाचे उत्पादन मागच्या वर्षापर्यंत सरासरी ३ कोटी ६० ते ८० लाख गाठी इतके होत आहे. राज्यात ६० ते ८० लाख गाठींचे उत्पादनाचे प्रमाण आहे. गेल्यावर्षी जगासह देशात सरकी ढेपीचे दर प्रतिक्विंटल ३ हजार २०० रुपयांपर्यंत पोहोचले. त्यामुळे कापसाला प्रतिक्विंटल ५८०० रुपये दर मिळाला. तथापि, यावर्षी कापसाचे, रुईचे दर अमेरिका व जगाच्या बाजारात घटले आहेत. 

सरकी व ढेपीचे दरही कमी होण्याचे संकेत आहेत. यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे दर २ हजार रुपयांनी कमी होऊन ते यावर्षी ५८०० रुपयांवरून ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलच्या खाली आले आहेत. बाजारात कापसाला अपेक्षित दर मिळणार नसल्याने कापूस पणन महासंघ तसेच सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) कडेच कापसाचा ओघ वाढेल, असे असताना सरकारी यंत्रणा मात्र १५ नोव्हेंबरपर्यंत कापूस खरेदी सुरूकरणार नाहीत. जर निवडक संकलन केंद्रांवर खरेदी सुरूकेली तरी प्रचंड जाचक अटी टाकतील, अशी भीती वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी  यांनी व्यक्त केली आहे. 

निवडणुकीच्या धामधुमीत कुणी लक्ष देईना देशात सर्वाधिक कापूस लागवड महाराष्ट्रात होते. राज्यात पाच वर्षांपासून सरासरी ४० लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होत आली आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश शेतीचे अर्थकारण कापूस पिकावरच अवलंबून आहे. सुमारे १० टक्के क्षेत्रावरच पूर्वहंगामी कापूस लागवड असते. गेली चार ते पाच वर्षे कापूस उत्पादकांसाठी खडतर गेली. मागील वर्षी राज्यात २०१८-१९ च्या हंगामात ४२.५४ लाख हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड करण्यात आली होती. उत्पादन केवळ ७१ लाख गाठी झाले. उत्पादकता २८३.७३ किलोग्रॅम प्रतिहेक्टर इतकी कमी आहे. कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाच्या अहवालात या अल्प उत्पादकतेकडे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र एकही नेता, सत्तेतील व विरोधी बाकावरील राजकीय पक्ष या विषयावर बोलत नाही याची खंत वाटते, असे मत तिवारी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबादvidhan sabhaविधानसभा