दिल्लीकडून महाराष्ट्राचा महिला संघ पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:44 IST2018-01-25T23:44:43+5:302018-01-25T23:44:48+5:30
मुंबई येथे झालेल्या महिलांच्या टष्ट्वेंटी-२0 सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत दिल्ली संघाने महाराष्ट्रावर ७ गडी राखून दणदणीत मात केली. या विजयामुळे दिल्लीला ४ गुण मिळाले आहेत.

दिल्लीकडून महाराष्ट्राचा महिला संघ पराभूत
औरंगाबाद : मुंबई येथे झालेल्या महिलांच्या टष्ट्वेंटी-२0 सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत दिल्ली संघाने महाराष्ट्रावर ७ गडी राखून दणदणीत मात केली. या विजयामुळे दिल्लीला ४ गुण मिळाले आहेत.
दिल्लीच्या गोलंदाजांनी महाराष्ट्राला २0 षटकांत ९ बाद ५८ धावांवर रोखले. महाराष्ट्राकडून श्वेता माने (२२) हिच्याशिवाय एकही फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्या पार करू शकला नाही. दिल्लीकडून आर.ए. धर हिने १४ धावांत ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात दिल्लीने विजयी लक्ष्य १४.४ षटकांत ३ गडी गमावून ६१ धावा करीत गाठले. त्यांच्याकडून नेहा तन्वर हिने सर्वाधिक ५ चौकारांसह २२ धावा केल्या. महाराष्ट्राकडून मुक्ता मगरे हिने ९ धावांत २ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र : २0 षटकांत ९ बाद ५८. (श्वेता माने २२, श्वेता जाधव ७, देविका वैद्य ७, आर.ए. धर ४/१४, अंकिता सिन्हा २/१२).
दिल्ली : १४.४ षटकांत ३ बाद ६१. (नेहा तन्वर २२, मनदीप कौर १५, आरुषी गोयल १२. मुक्ता मगरे २/९, देविका वैद्य १/१९).