शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

देशभर गाजणाऱ्या ६०० कोटींच्या एलएफएस शेअर ब्रोकिंगचा महाराष्ट्र प्रमुख अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:57 IST

आत्तापर्यंत कंपनीवर ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र, झारखंड, गुजरातमध्ये गुन्हे दाखल आहेत.

छत्रपती संभाजीनगर : २० ते ३६ टक्क्यांपर्यंत व्याजदराचे आमिष दाखवून एलएफएस ब्रोकिंग कंपनीने देशभरात ६ हजारांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. देशभरात गाजत असलेल्या या घोटाळ्यातील कंपनीचा महाराष्ट्र प्रमुख विनोद बाळासाहेब माने (३०, रा. शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक) याला मंगळवारी अटक केली. शहर आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. न्यायालयाने त्याला ७ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.

शहरात २० फेब्रुवारी रोजी या कंपनीवर फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरात कंपनीचे माने व शहर व्यवस्थापक विनोद त्र्यंबक साळवे यांनी ३५पेक्षा अधिक गुंतवणूकदारांकडून ३ कोटींपेक्षा अधिक रक्कम हडप केली. जुलै २०२३ मध्ये कंपनीला कुलूप लावून आरोपी पसार झाले होते. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अशोक अवचार, अंमलदार विठ्ठल मानकापे यांनी कंपनीचा संचालक सय्यद जियाजूर रहेमान व शहर व्यवस्थापक विनोद साळवेला अटक केली होती. माने मात्र पसार होता. उपनिरीक्षक अवचार यांच्या पथकाने मंगळवारी त्याला भूम तालुक्यातून अटक केली.

अशी आहे घोटाळ्याची पार्श्वभूमी-शहरात ३ कोटीपर्यंत गुंतवणूकदार, राज्यभरात ३५ कोटींपर्यंत उलाढाल-देशात ६ हजार २१९ गुंतवणूकदारांकडून ६०० कोटींपेक्षा अधिक रक्कम हडपली-जून २०२४मध्ये फसवणूकप्रकरणी सेबीकडून कंपनीवर बंदी-जुलै २०२४मध्ये भुवनेश्वर पोलिसांकडून अटक, तर मार्च २०२५मध्ये शहर पोलिसांकडून सय्यद जियाजूर रहेमानला ताब्यात घेतले.

माने, साळवेला विशेष टक्केवारीप्रत्येक गुंतवणुकीवर मानेसह साळवेला पगाराव्यतिरीक्त विशेष टक्केवारी मिळत होती. बी. एस्सी., एमबीए (फायनान्स) ची पदवी असलेला माने २०१७ पासून कंपनीत कामाला होता. काही वर्षांपूर्वी त्याला महाराष्ट्र हेड बनवण्यात आले. शहर आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्यात १,६४५ पानांचे दोषाराेपपत्र सादर करण्यात आले आहे.

देशभरात ११८ बँक खाती, ६३ मालमत्ता जप्तआत्तापर्यंत कंपनीवर ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र, झारखंड, गुजरातमध्ये गुन्हे दाखल आहेत. ईडीकडून याचा समांतर तपास सुरू असून, २४ मे रोजी त्यांनी संचालक दिलीप कुमार मैती व अनारुल हुसैनी यांना अटक केली. आत्तापर्यंत त्यांनी संचालकांची ११८ बँक खाती, ६३ मालमत्ता जप्त करण्यात यश मिळवले. ज्यात हॉटेल, रिसॉर्ट, जमीन, बंगला, फ्लॅटसह दुबईतील इमारत जप्त करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांनी तक्रारीसाठी समोर यावे, असे आवाहन उपनिरीक्षक अशोक अवचार यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfraudधोकेबाजीshare marketशेअर बाजार