शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एमआयएमचे वादळ कोणता पक्ष रोखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:25 IST

औरंगाबाद मध्यमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लागला कामाला

ठळक मुद्देपुन्हा एकदा राष्ट्रवादी मुस्लिम उमेदवाराला संधी देणारएमआयएम शेवटी पत्ते उघडणार

औरंगाबाद : मध्य विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये शिवसेना-भाजपमधील मतांच्या विभाजनाचा फायदा नवोदित एमआयएम पक्षाला झाला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे वादळ रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली आहे. पुन्हा एकदा राष्ट्रवादी मुस्लिम उमेदवाराला संधी देणार आहे. २००९ मध्ये राष्ट्रवादीला या मतदारसंघात निसटता पराभव स्वीकारावा लागला होता.

मागील दहा वर्षांमध्ये मध्य विधानसभा मतदारसंघात राजकीय ‘रंग’बदलले आहेत. कधीकाळी हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला होता. शिवसेनेतून बाहेर पडलेले प्रदीप जैस्वाल यांनी शहर प्रगती आघाडीची स्थापना करून निवडणूक लढविली. जैस्वाल यांना सेना-भाजपसह इतरांनीही भरभरून मतदान केले होते. त्यामुळे त्यांनी सेनेचे उमेदवार विकास जैन यांचा दारुण पराभव केला होता. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कदीर मौलाना होते. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एमआयएमच्या विरोधात विनोद पाटील यांना उमेदवारी दिली. पाटील यांना अवघ्या दहा हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. कारण १०० टक्के मुस्लिम मतदार एमआयएमच्या पाठीशी उभे होते.

मागील पाच वर्षांमध्ये एमआयएमचा आलेख झपाट्याने खालावला आहे. पूर्वीसारखे वादळ यंदा राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात मुस्लिम चेहरा देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील आठवड्यात कदीर मौलाना यांना उमेदवारीचे संकेतही देण्यात आले आहेत. त्यानुसार मौलाना कामाला लागले आहेत. त्यांनी मतदारसंघात भेटीगाठींवर सर्वाधिक भर देण्यास सुरुवात केली आहे. तीन वर्षांपूर्वी मध्य मतदारसंघातील बुढीलेन या मनपाच्या वॉर्डात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एमआयएम उमेदवाराचा दारुण पराभव केला होता. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचा बोलबाला हळूहळू वाढत आहे. एमआयएमकडे असलेला हा विधानसभा मतदारसंघ हिसकावून घेण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे.

युतीकडून यंदा कोण?शिवसेना-भाजप युतीचे अद्याप निश्चित नाही. युतीचा उमेदवार नेमका कोण हेसुद्धा गुलदस्त्यात आहे. हा मतदारसंघ युतीमध्ये सेनेकडे आहे. सेनेकडून प्रदीप जैस्वाल उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत.  सेनेकडून आणखी काही इच्छुकांनी उमेदवारीवर दावा ठोकला आहे. युती न झाल्यास भाजपकडून पुन्हा एकदा किशनचंद तनवाणी निवडणूक रिंगणात दिसून येतील. अशा परिस्थितीत मतदारांची मोठी परीक्षा राहणार आहे.

एमआयएम शेवटी पत्ते उघडणारमध्य मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी एमआयएम पक्ष प्रयत्न करणार आहे. या मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यावी हा पक्षासमोर मोठा पेच आहे.३० इच्छुकांपैकी एकाची पक्षाला निवड करावी लागणार आहे. जावेद कुरैशी यांची वर्णी पक्षाकडून लावण्यात येऊ शकते. सर्वात शेवटी औरंगाबाद मध्यचा उमेदवार एमआयएम घोषित करणार आहे. 

२००९ मध्ये मध्यची स्थिती :उमेदवार    एकूण मतेप्रदीप जैस्वाल    ४९,९६५अ. कदीर मौलाना    ४१,५८१विकास जैन    ३३,९८८

२०१४ मध्ये मध्यची स्थिती :उमेदवार    एकूण मतेइम्तियाज जलील    ६१,८४३ किशनचंद तनवाणी    ४०,७७०प्रदीप जैस्वाल    ४१,८६१विनोद पाटील    ११,८४२

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेस