शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘सिल्लोड’वर डोळा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 17:17 IST

राष्ट्रवादीच्या रंगनाथ काळेंना शरद पवार यांचे आशीर्वाद 

ठळक मुद्देसिल्लोड-सोयगावमध्ये बंडखोरी होणार नाही

सोयगाव : औरंगाबादेत दोन दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघासाठी रंगनाथ काळे यांना आशीर्वाद दिल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यामुळे राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.         १९९९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून सोयगाव तालुक्यातील काँग्रेसचे उमेदवार रंगनाथ काळे यांना उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी झालेल्या चौरंगी लढतीत रंगनाथ काळे यांचा निसटता पराभव झाला होता. त्यानंतर पक्ष नेतृत्वाने अप्पासाहेब बाबूरावजी काळे यांचा वारसा पुढे नेणाऱ्या रंगनाथ काळे यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे रंगनाथ काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

दरम्यान, त्यानंतरही सिल्लोड- सोयगाव हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहिला. अलीकडे अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. परिणामी, या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे प्रबळ उमेदवार नाही. त्यामुळे औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात सिल्लोड- सोयगाव हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते रंगनाथ काळे यांना आशीर्वाद दिला व यासंदर्भात दोन्ही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा करून याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे बोलले जाते. 

सिल्लोड-सोयगावमध्ये बंडखोरी होणार नाहीसिल्लोड-सोयगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोेडल्यास सध्या काँग्रेसचे दावेदार प्रभाकर पालोदकर हे रंगनाथ काळे यांच्या पाठीशी राहतील. हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहिल्यास रंगनाथ काळे हे प्रभाकर पालोदकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील, असे या नेत्यांमध्ये अगोदरच ठरले आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार नाही, हे यामुळे स्पष्ट आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांसाठी समन्वयाचा हा निर्णय विजयाच्या मार्गावर नेणारा ठरणार आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेस