महाकेशर आंबा बागायतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:30 IST2020-12-17T04:30:19+5:302020-12-17T04:30:19+5:30

औरंगाबाद : महाकेशर आंबा बागायतदार संघातर्फे दि. १ ते १५ मे दरम्यान आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ...

Mahakeshar Mango Gardener | महाकेशर आंबा बागायतदार

महाकेशर आंबा बागायतदार

औरंगाबाद : महाकेशर आंबा बागायतदार संघातर्फे दि. १ ते १५ मे दरम्यान आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आंबा पिकविमा व निर्यात धोरणाविषयी फलोत्पादनमंत्री संदिपान भूमरे आणि पणन व्यवस्थापकीय संचालकांबरोबर चर्चा करण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला.

महाकेशर आंबा बागायतदार संघाची बैठक वडवळी येथे संघाचे संचालक नंदलाल काळे यांच्या शेतात ११ डिसेंबरला पार पडली. यावेळी शिवार फेरी करण्यात आली. उपाध्यक्ष डाॅ. भगवान कापसे, संचालक शेख रसुल यांनी छाटणी व मशागती संदर्भात माहिती दिली. यावेळी शेजारच्या ड्रॅगन फ्रुट बागेचीही माहिती देण्यात आली. संघाचे अध्यक्ष सुशील बलदवा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत सात ठराव पारीत करण्यात आले. यावेळी त्रिंबक पाथ्रीकर, पंडीत लोणारे, शिवाजी उगले, रमेश अहिरराव, अशोक सूर्यवंशी, प्रकाश कापसे आदींची उपस्थिती होती.

बैठकीत बायागायतदार संघाचा लोगो तयार करणे, खास पद्धतीने वितरण प्रणालीचा अमंलबजावणी, बहर संरक्षणासाठी वेबिनार, पिक विमा निकषात बदल करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे आदी ठराव बैठकीत घेण्यात आल्याचे बलदवा यांनी कळवले आहे.

Web Title: Mahakeshar Mango Gardener