अवयवदानाचा शहरात महाजागर
By Admin | Updated: August 31, 2016 00:35 IST2016-08-31T00:06:51+5:302016-08-31T00:35:36+5:30
औरंगाबाद : ‘अवयवदान श्रेष्ठ दान’,‘बी अ डोनर, बी अ हीरो’, ‘असहाय रुग्णांना द्या जीवनाची अमूल्य भेट’ अशा विविध घोषणा देत मंगळवारी जनजागरण रॅलीतून अवयवदानाचा महाजागर करण्यात आला.

अवयवदानाचा शहरात महाजागर
औरंगाबाद : ‘अवयवदान श्रेष्ठ दान’,‘बी अ डोनर, बी अ हीरो’, ‘असहाय रुग्णांना द्या जीवनाची अमूल्य भेट’ अशा विविध घोषणा देत मंगळवारी जनजागरण रॅलीतून अवयवदानाचा महाजागर करण्यात आला. अवयवदानास चालना मिळावी, यासाठी राबविण्यात येणाऱ्या महाअभियानास जनजागरण रॅलीने प्रारंभ झाला. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसह महाविद्यालयीन युवक-युवती व शहरवासीयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), झोनल ट्रान्सप्लांट को-आॅर्डिनेशन कमिटी (झेडटीसीसी) यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. घाटी रुग्णालयाच्या परिसरातून रॅलीस प्रारंभ झाला. याप्रसंगी महापौर त्र्यंबक तुपे, आ. अतुल सावे, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, आरोग्य उपसंचालक डॉ. आर.टी.चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी.एम. गायकवाड, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.पी.डांगे, विभागीय शासकीय कॅन्सर हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ.अरविंद गायकवाड, ‘घाटी’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुहास जेवळीकर, उपअधीक्षक डॉ. सुधीर चौधरी, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिवाजी सुक्रे, झोनल ट्रान्सप्लांट को-आॅर्डिनेशन कमिटी (झेडटीसीसी) चे अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी, युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे डॉ. उन्मेष टाकळकर, डॉ. अजय रोटे, डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे डॉ. अनंत पंढरे, डॉ.अश्विनीकुमार तुपकरी, बजाज हॉस्पिटलचे डॉ.व्यंकट होळसांबरे, डॉ.रवींद्र भट््टू, डॉ.वैभव गंजेवार, डॉ.श्रीगणेश बर्नेला, डॉ.नताशा कौल, उमेश धावणे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.दत्ता कदम, डॉ.ए.एस.दामले, डॉ.श्रीनिवास गडप्पा, अभ्यागत समितीचे नारायण कानकाटे, जेम्स अंबिलढगे, डॉ.वर्षा रोट्टे, डॉ.साधना कुलकर्णी यांच्यासह घाटी रुग्णालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिस्तबद्ध आणि लांब रांग असलेल्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ज्युबिली पार्क, मिलकॉर्नर, वरद गणेश मंदिर, सिद्धार्थ उद्यानामार्गे रॅलीचा घाटी परिसरात समारोप झाला.