महापालिकेत ८२ आक्षेपांवर सुनावणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:36 IST2017-07-29T00:36:06+5:302017-07-29T00:36:06+5:30
नांदेड: मनपा निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या प्रभागरचना व आरक्षणाच्या सोडतीसंदर्भात शुक्रवारी ८२ आक्षेपांची सुनावणी पूर्ण करण्यात आली़ मुंबई महाराष्ट्र प्राधिकरणचे सदस्य सचिव संतोषकुमार यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली़

महापालिकेत ८२ आक्षेपांवर सुनावणी पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: मनपा निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या प्रभागरचना व आरक्षणाच्या सोडतीसंदर्भात शुक्रवारी ८२ आक्षेपांची सुनावणी पूर्ण करण्यात आली़ मुंबई महाराष्ट्र प्राधिकरणचे सदस्य सचिव संतोषकुमार यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली़
येत्या आॅक्टोबरमध्ये मनपाची निवडणूक होणार आहे़ त्यासाठी १० जुलै रोजी प्रभागरचना व आरक्षण सोडत काढण्यात आली होती़ त्यानंतर मनपाच्या प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना ११ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती़ तसेच त्यावर हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते़ त्यानुसार नऊ दिवसांत एकूण ८२ आक्षेप व सुनावणी दाखल करण्यात आल्या होत्या़ शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेपासून स्थायी समितीच्या सभागृहात संतोषकुमार, आयुक्त गणेश देशमुख, निवडणूक विभागाचे उपायुक्त संतोष कंदेवाड यांच्यासमोर हरकती आणि आक्षेपावर सुनावणी घेण्यात आली़ या सुनावणीसाठी एकूण १५ गट तयार करण्यात आले होते़ त्यामध्ये प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्यात आला होता़ प्रभागरचना, लोकसंख्या आणि मतदारांच्यासंदर्भात हरकती आणि आक्षेप दाखल करण्यात आले होते़