शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

‘महाविक्रमी’ महामॅरेथॉन ! ; औरंगाबादच्या लोकमत महामॅरेथॉनला लाभला देशविदेशातील हजारो स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 15:02 IST

‘मी धावलो शहरासाठी आणि शहर धावले माझ्यासाठी’ या जनभावनेचा ‘याचि देही, याची डोळा’ अनुभव रविवारी (दि.१७) लोकमत महामॅरेथॉनमध्ये आला. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या स्पर्धेची उत्सुकता संपूर्ण औरंगाबाद शहराला लागली होती ती महामॅरेथॉन हजारो धावपटूंच्या भरघोस प्रतिसाद अतियश नियोजनबद्ध आणि असीमित उत्साहात पार पडली.

ठळक मुद्देगेल्या अनेक महिन्यांपासून ज्या स्पर्धेची उत्सुकता संपूर्ण औरंगाबाद शहराला लागली होती ती महामॅरेथॉन हजारो धावपटूंच्या भरघोस प्रतिसाद अतियश नियोजनबद्ध आणि असीमित उत्साहात पार पडली.नातवंडापासून आजी-आजोबांपर्यंत सर्व वयोगाटातील स्पर्धकांच्या सहभागामुळे मॅरेथॉनला एका कौटुंबिक स्वरुप प्राप्त झाले होते.महामॅरेथॉनच्या २१ किमी मार्गावर लोक ठिकठिकाणी जमून धावपटूंचा उत्साह वाढवत होते.

औरंगाबाद : ‘मी धावलो शहरासाठी आणि शहर धावले माझ्यासाठी’ या जनभावनेचा ‘याचि देही, याची डोळा’ अनुभव रविवारी (दि.१७) लोकमत महामॅरेथॉनमध्ये आला. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या स्पर्धेची उत्सुकता संपूर्ण औरंगाबाद शहराला लागली होती ती महामॅरेथॉन हजारो धावपटूंच्या भरघोस प्रतिसाद अतियश नियोजनबद्ध आणि असीमित उत्साहात पार पडली. नातवंडापासून आजी-आजोबांपर्यंत सर्व वयोगाटातील स्पर्धकांच्या सहभागामुळे मॅरेथॉनला एका कौटुंबिक स्वरुप प्राप्त झाले होते.

२१ किमी, १० किमी, ५ किमी आणि ३ किमी आणि वेटरन वॉक अशा विविध गटांत पार पडलेल्या या स्पर्धेत देशाविदेशातील स्पर्धकांनी सहभगा नोंदवत बंधुभाव, एकता, आरोग्य आणि समानतेचा संदेश देत दौड लगावली. क्रीडा संकुल येथून सकाळी सहा वाजता महामॅरेथॉनच्या २१ किमी गटाच्या स्पर्धेला तर सव्वासहा वाजता १० किमी गटाच्या मॅरेथॉनला सुरुवात झाली. 

यावेळी ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, ‘सखी मंच’च्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा, महापौर नंदकुमार घोडेले, ब्रिगेडियर डी. के. पात्रा, विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भांबरे,जिल्हाधिकारी नवलकिशोर राम , धर्मदाय सहआयुक्त श्रीकांत भोसले, उपायुक्त वर्षा ठाकूर, सिनेअभिनेत्री संस्कृती बालगुडे, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे उपअधिक्षक शिवाकांत बाजपेयी, प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते, घाटीचे प्रभारी अधिष्ठाता शिवाजी सुक्रे, सॅफ्रॉन गु्रपचे अनिल मुनोत, मनोज काला, ललित झांबड, राजेश वरंगटवार, महेश लापशेटवार, मनिष पारिख, संदीप युनिव्हर्सिटीचे संदीप पवार, प्राईड ग्रुपचे नितीन व नवीन बगडिया, धुत हॉस्पिटचे विजय बोरगावकर, युनायटेड सिग्माचे उन्मेश टाकळकर, संजीव आॅटोचे राजीव तांबोलकर, औरंगाबाद अमॅच्युएर अ‍ॅथेलिटिक्स असोसिएशनचे फुलचंद सलामपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

यासोबतच ‘लोकमत’चे कार्यकारी संचालक करण दर्डा, ‘वॉव’च्या संस्थापक अध्यक्षा रुचिरा दर्डा यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवला. किशोर जाधव यांनी २१ किमी पुरुष गटात तर प्राजक्ता गोडबोले यांनी २१ किमी महिला गटात प्रथम स्थान पटकावत लोकमत महामॅरेथॉनचे विजेतेपद आपल्या नावे करण्याची कामगिरी केली. १० किमी गटात रवी दास आणि पूजा श्रीडोळे यांनी आपापल्या गटात पहिले येण्याचा बहुमान मिळवला. २१ किमी वेटरन गटामध्ये कैलास माने (पुरुष) आणि शोभा देसाई (महिला) यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत पहिले स्थान मिळवले. २१ किमी डिफेन्स गटात भागेश पाटील आणि अश्विनी देवरे यांनी प्रथम स्थान प्राप्त केले. १० किमीच्या वेटरन गटात भगवान कचरे (पुरुष) आणि मोनिका माहेश्वरी (महिला) यांनी विजेतेपदावर नाव कोरले. विदेशी २१ किमी गटात केनियाच्या ब्रिगिड किमितवाई हिने वर्चस्व गाजवले.

बक्षीस वितरणमॅरेथॉन पूर्ण करून विभागीय क्रिडा संकुलात आलेल्या मॅरथॉनपटूंचे ‘पावन गणेश मंडळा’चे ढोलपथक आणि ‘मोक्ष’ रॉक बँडतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. संगीताच्या तालावर ठेका धरून हजारो शहरवासीयांनी आपला ‘कौतुकास्पद’ उत्साह दाखवून दिला. त्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, सिनेअभिनेता देवदत्त नागे, संस्कृती बालगुडे, खा. चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, आ. सतीश चव्हाण आदींच्या हस्ते विजेत्या मॅरेथॉनपटूंना बक्षीस वितरण करण्यात आले. 

औरंगाबाद शहराचा अभूतपूर्व प्रतिसादमहामॅरेथॉनच्या २१ किमी मार्गावर लोक ठिकठिकाणी जमून धावपटूंचा उत्साह वाढवत होते. कोणी ढोल वाजूवन, कोणी रांगोळी काढून, कोणी रॉक बँडसह, कोणी मॅरेथॉनपटूंचया अंगावर फुले टाकून स्वागत केले. शाळकरी विद्यार्थ्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. मुलांच्या लेझिम पथकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. लोक टाळ्या आणि प्रोत्साहनपर आरोळ्या व चिअर अप करून धावपटूंचा उत्साह वाढवत होते. मॅरेथॉनमार्गाच्या दोन्ही बाजूला उभे राहून लोक उत्सुकतेने बघत होते. 

उत्तम नियोजन व सुविधामहामॅरेथॉनमध्ये स्पर्धक व शहरवासीयांच्या सुविधेसाठी सुनियोजन केले होते. स्पर्धकांसाठी मार्गावर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, रुग्णवाहिका, तत्पर स्वयंसेवकर, सफाई स्वयंसेवक तयार होते. शहराच्या वाहतूकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी रस्त्यांचे एकमद चोख नियोजन करून पर्यायी मार्गांची उत्तम व्यवस्था केली होती. तसेच मॅरथॉनअंती विभागीय क्रीडा संकुलात धूत हॉस्पिटल व युनायटेड सिग्मा यांच्यातर्फे हेल्स कॅम्प उपलब्ध करून देण्यात आला होता. तसेच रिलॅक्स झील ग्रुपतर्फे फिजिओ सेंटरचीही सुविधा होती. धावपटूंना नाश्त्याचीदेखील सुविधा करण्यात आली होती.

विजेते : २१ किमी खुला गट (पुरुष)प्रथम - किशोर जाधव (२१०४७)द्वितीय - गजानन ढोल (२१०७४)तृतीय - विठ्ठल आठवले (२१०७७)

२१ किमी खुला गट (महिला)प्रथम - प्राजक्ता गोडबोले (***)द्वितीय - पूजा राठोड (२१३९४)तृतीय - भारती दुधे (२१०३१)

२१ किमी वेटरन गट (पुरुष)प्रथम - कैलास माने (२१३२०)द्वितीय - लक्ष्मण शिंदे (२१३७८)तृतीय - राजेश साहू (२१३५०)

२१ किमी वेटरन गट (महिला)प्रथम - शोभा देसाई (२१४१४)द्वितीय - माधुरी निमजे (२१४२१)तृतीय - शोभा पाटील (२१४२०)

२१ किमी डिफेन्स (पुरुष)प्रथम - भागेश पाटील (२५००६)

२१ किमी डिफेन्स (महिला)प्रथम - अश्विनी देवरे (२११९६)

१० किमी खुला गट (पुरुष)प्रथम - रवी दास (१०४३६)द्वितीय - एम. हरिया (१०३५१)तृतीय - लालू हिरण्य (१०५१४)

१० किमी खुला गट (महिला)प्रथम - पूजा श्रीडोळे (११६४०)द्वितीय - निकिता नागपुरे (११७१०)तृतीय - सोनाली पवार (११४२४)

१० किमी वेटरन गट (पुरुष)प्रथम - भगवान कचरे (**)द्वितीय - अरुण लव्हारे (११४१०)तृतीय - पांडुरंग पाटील

१० किमी वेटरन गट (महिला)प्रथम - मोनिका माहेश्वरीद्वितीय - सुनिती आंबेकरतृतीय - अनुराधा कच्छवे

२१ किमी  विदेशी गटब्रिगिड किमितवाइ

टॅग्स :MarathonमॅरेथॉनAurangabadऔरंगाबाद